Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8& तंबाखु, भांग, गांजा वगैरे नेहमींचींच धूम्रपानें होऊन बसलीं आहेत. त्यापासून समाजाचें सर्वतोपरी भयंकर नुकसान होऊं लागलें मुळे लालापिंडांचा क्षोभ होऊन लाळ उत्पन्न होते. ही लाळ व्यर्थ धुंकून जात असल्यामुळे अर्थातू पचनक्रियेस अडथळा येतो. असाच किंबहुना याहून जास्त वाईट परिणाम तंबाखु खाल्यानें होती. तंबाखु ओढण्यानें घशाला गांठी येतात, त्यांतून कफ पडतो, खोकला येतो, छाती धडधडायाला लागते, घेरी येते व मज्जातंतू अशक्त होऊन भूक मंद होते. तसेंच तंबाखूनें जाठररसांतील लवणाम्ल वाढतें व त्यामुळे छातींत जळजळू लागतें. तंबाखूचा धूर डोळ्यांस लागून इष्टि मंद होते. या धूम्रपानांनीं देखील चहा वगैरे पेयांप्रमाणेंच थकलेले मज्जातंतू थोडा वेळ उत्तेजित होतात पण तें उत्तेजन चहाप्रमाणेंच क्षणिक असतें. दारूः-चहा कॉफीच्या पलीकडे ज्यांची मजल गेली आहे असे ह्मणजे मद्यपान करणारे यांची स्थिती तर फारच भयंकर! एकदां तोंडास मद्याचा स्पर्श झाला कीं तेव्हांपासूनच त्यांच्या नाशास सुरवात झाली असें ह्मणण्यास हरकत नाहीं. याच्या सेवनानें कितीतरी चांगलीं कुटुंबें धुळीस लागलीं आहेत व लागत आहेत हें आपण प्रत्यक्ष पाहत - असतां याचें डोळे झांकून कसें सेवन चाललें आहे याबद्दल नवल वाटतें ! यासंबंधानें लिहावें तितकें थोडेंच आहे. मद्यसेवनापासून होणा-या अति भयंकर परिणामांचें वर्णन थोडक्यांत पुढें दिलें आहे. मद्यानें अन्नमार्गाच्या छेष्मलत्वचेचा दाह होऊन त्यांत सूज येते. हा दाह दारूंत ज्या मानानें मद्यार्क (Alcohol) असेल ल्या मानानें होत असती. निरोगी स्थितींत शारीरिक किंवा मानसिक श्रमांनीं येणारा थकवा विश्रांति घेतल्यानें आपोआप नाहीसा होतो. दारूची संवय लागली आहे अशा लोकांनां हा थकवा दारू घेतल्यानंतर तितका जरी भासत नाहीं तरी एकदा त्याचा उत्तेजकपणा