Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ प्रकारांत सांगितल्याप्रमाणें पचनेंद्रियांवर दाब पडून त्यामुळे अग्रिमांद्य होतें. दुसरी गोष्ट अशी कों, अशा प्रकारच्या दाहक पदार्थोंनीं अन्नमार्गाच्या अंतस्वचेचा दाह होतो; अंतस्त्वचेंत असलेल्या जाठररसोत्पादक पिंडांना इजा होऊन त्यांची जाठररस तयार करण्याची शक्ति कमी होते व असें झालें म्हणजे जाठररस कमी होऊन त्यामुळे अग्रिमांद्य होतें. शिवाय असे तिखट मसालेदार पदार्थ खाण्यांत आल्यानें तहान फार लागते. व त्यामुळे वाजवीपेक्षां जास्त पाणी पिण्यांत येतें. याचा परिणाम असा होती कीं जो कांहीं थोडा बहुत जाठररस तयार झालेला असतो, त्यांत हें पाणी मिळून तो पातळ होतो व त्याची पचन करण्याची शक्ति कमी होते. अर्थात् खालेलें अन्न जिरत नाहीं. अशा स्थितींत तें अन्न तेथें पडून राहिल्यानें कुजू लागतें. अन्न कुज्हूं लागलें म्हणजे त्याचा आम्लपणा जास्त जास्त वाढत जातो. ज्याप्रमाणें घोडा बुजल्यामुळे गाडी मोडते व मग मोडलेल्या गाडीचे मोडके पोल घेऊन तो धांवत सुटती व धांवत असतां जितका जितका तो जास्त जोर करिती तितके तितके मोडलेल्या पोलाचे तुकडे त्याच्या अंगांत अधिक शिरतात त्याप्रमाणें अगोदरच तिखट पदार्थानीं आमाशयाचा दाह झालेला असतो व त्यांत अशा कुजलेल्या अन्नाचा आम्लपणा त्याला झोंबतांच अंतस्त्वचेस चरे पडतात; त्यांतून रक्त येऊं लागतें; श्लेष्मल स्राव निघती; उलब्या होतात; पोटांत कांहीं टिकत नाहींसे होतें; डीकें दुखू लागतें; ताप येतो; वगैरे लक्षणें होतात. शिवाय असे पदार्थ तोंडांत घातल्यावर तोंड येणें, घसा व गलमार्ग यांच्या अंतस्त्वचेचा दाह होऊन त्यांतून कफ पडणें वगैरे लक्षणें होतात तीं निराळींच. चहा, कॉफी, दारू वगैरेपेयपदार्थाचें व धूम्रपानादि व्यसनांचें आपल्या लोकांमध्यें इतकें कांहीं प्रस्थ माजलें आहे कीं, श्रीमंत असो, वागरीव असो, ज्याला त्याला आपल्या आवडीप्रमाणें यांपैकीं, कांहींना कांहीं पाहिजे असतें. सकाळ उजाडली नाहीं तोंच लहानापासून थोरापर्यंत पहिली गोष्ट म्हटली म्हणजे चहा ! मुंबईसारख्या शहरांत तर गरीब भिकारी