Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ गतात), वरण, तूप, सांभारॅ, गव्हांची पोळी (यांनां ३ पासून ४ तास लागतात), दहीं (याला तीन तास लागतात), मांसाहा-यांनां मासे (यानां १॥। पासून २॥ तास लागतात), किंवा बकन्याची सागुती (हिला तीन तास लागतात), शाक, भाज्या वगैरे पदार्थ येत असल्यामुळे अशा जेवणाला तरी पचण्यास साधारण मानानें चार तासांचा अवधि लागतो. हा अवधि चांगल्या रीतीनें चर्वण केलेल्या अन्नाला पचविण्यास स्वस्थावस्थेंत लागत असतो. परंतु घाईनें बरोबर चर्वण न करितां । गिळलेल्या अन्नाला, एक दोन तास जास्त लागतात. तशांत जेवणानंतर कचेरीस जाण्याची धांवपळ, कामाचा बोजा वगैरे प्रकार असले तर आणखीहि वेळ लागतो. दुपारीं एक दोनच्या दरम्यान उपहाराची वेळ होते. त्यावेळींही चहा, दूध, भजीं, शिरापुरी वगैरे पदार्थ खाण्यांत येतात. अगोदरच सकाळीं ८ वाजतां पिण्यांत आलेला चहा पचण्यापूर्वी त्यांत ब्रेह्यांकडचा चहा घेण्यांत आलेला असतो. त्यांत कचेरीस जाण्याकरितां घाईनें जेवण झालेलें असतें. त्यामुळे हे पदार्थ आमाशयांत गेल्यावर जाठररसांत फरक होऊन त्यांतील लवणाम्ल वाढतें. लवणाम्ल वाढलें म्हणजे त्या माणसाचे पोटांत आग झाल्यासारखें होतें. असें झालें ह्मणजे ला माणसास भूक लागली असें वाटून तो आणखी त्यावर दूध, शिरा, चहा वगैरे पदार्थ घेत असतो. नंतर संध्याकाळीं घरीं आल्यावर चहा किंवा त्याबरोबर कांहीं तरी लाडू वगैरे इतर दुसरे पदार्थ खाण्यांत येतातच. त्यानंतर कोणाकडे जाणें झाल्यास नको नको ह्मणतां आणखी एखादा तरी चहाचा पेला वर जातो तो निराळा. इतक्यांत ७-८ वाजतां रात्रीच्या जेवणाची वेळ होते. त्यांत सकाळच्या जेवणाहूनही जास्त पदार्थ खाण्यांत येण्याचा संभव असतो. कारण सगळ्या दिवसांत हेंच कायतें स्वस्थ असें जेवण होतें. अशा रीतीनें एकावर एक अशी भर पडत गेल्यानें आमाशयाला रिकामपण असें मुळच मिळत नाहीं व त्यामुळे तो थकून त्यापासून अग्रिमांद्य उत्पन्न होतें.