Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ उत्पन्न होऊन त्यांचा परिणाम पचनेंद्रियांवर होतो; व त्यामुळेही अग्रिमांद्य होतें. तसेंच वारंवार अन्न खाणें हा देखील फाजील अन्नाचाच प्रकार आहे. वार्रवार अन्न खाणें:-ह्मणजे अगोदर खालेल्या अन्नाचें पचन झाल्याशिवाय त्यावर आणखी अन्न घेत जाणें. याला आर्यवैद्यकांत अध्यशन असें नांव दिलें आहे. या संबंधानें बहुतेकांस याचा पुढ़ें काय परिणाम होती याचें ज्ञान नसतें व कियेकदां तें असूनही या बाबतींत द्यावें तितकें लक्ष्य देण्यांत येत नाहीं. त्यामुळे ज्याप्रमाणें भात करण्यासाठीं एकदा आधणाच्या पाण्यांत तांदूळ सोडल्यावर मग जेवणारे जसजसे वाढत जातील तसतसे त्या पाण्यांत भात वाढविण्यासाठीं आणखी आणखी तांदूळ सोडीत रहावें ह्मणजे त्या भाताची ज्याप्रमाणें स्थिति होते तसाच प्रकार पहिल्यानें खाछेलें अन्न जिरण्यास अवकाश न देतां त्यावरच वारंवार खात गेल्यानें होत असतो. हा प्रकार खालीं दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट लक्ष्यांत येईल. अलीकडे सकाळीं शौच मुखमार्जन झाल्यावर आपले लोक साधारण आठ वाजतां लोणी किंवा तूप लावलेल्या पावाच्या कापट्यांबरोबर किंवा नुस्ताच चहा, किंवा बिस्किट्स, लाडू वगैरे यांपैकीं कांहीं तरी खाऊन मग त्यावर चहा, किंवा कॉफी वगैरे घेत असतात. एकंदरींत आपल्या लोकांची सकाळचहानेंच सुरु होते असें ह्मणण्यास हरकत नाहीं. असो. याचें आमाशयांत पचन होण्यास साधारण मानानें दोन अडीच तास लागतात. अशा वेळीं खेह्यांकडे जाण्याचा प्रसंग आल्यास त्यांत आणखी एक दोन पेले चहा-खेह्यांच्या आग्रहानें का होईना-जातच असतो. ही एक दोन पेल्यांची भर सकाळीं खालेले पदार्थ जिरण्याची क्रिया चाललेली असतांना येऊन पडत असते. इतक्यांत म्हणजे दहा वाजतां जेवणाची वेळ होते. कारण नोकरीवर लवकर जाण्याचा तगादा असतोच. ह्या जेवणांत भात (याला पचण्यास साधारण मानानें २ तास ला ३ अग्नि०