Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ मोसीस्) तिच्यामुळे अपचनानें उत्पन्न होणारीं विषारी द्रव्यें देखील रक्तांत शोषिलीं जातात. आंतड्यांचे अंगीं एक प्रकारची गति असते; तिला तृणजलूकागति (पेरिस्टाल्सिस्) असें ह्मणतात. या गतीमुळेच आपण खालेलें अन्न अन्ननलिकेंतून जात असतां एकदम गुदद्वाराने सटकन् न निघतां आंतडें त्याला धरसोड धरसोड करीत असतें. शिवाय पोषक रस जागजागीं शोषण होण्यास बरें पडतें. तृणजलूकागति ही आंतड्यांशीं संबंध असलेल्या मज्जातंतूंमुळे होत असते. शिवाय, आंतड्यांतील मल व वायु यांच्या दाबानें व पित्ताच्या रे , गतिदायक, वगैरे गुणांनींही तिला मदत होते. मोठ्या आतड्यांतील पचनक्रिया. मोठे आंतडें हें सुमारें ६ फूट लांब असून त्याची सुरवात बेंबीच्या खालीं उजव्या बाजूपासून होऊन, तें पोटाच्या शिंपीखालून कमानीसारखे वर वळून डाव्या बाजूनें खालीं येतें, · त्याचा गुदांत शेवट होतो. याचा व्यास लहान आंतड्याहून जास्त असतो. मल लहान आंतड्यांतून मोठ्या आंतड्यांत आला ह्मणजे त्यास थोडीशी घाण मारूं लागते. निरोगी स्थितींत ही घाण फार नसते. कारण त्यांत पित्त मिसळलेलें असतें. कांहीं कारणानें अन्नांत पित्त मिसळण्याचें कमी पडल्यास मळाला फार घाण मारते. मोठ्या आतड्याचा अन्नपचनाकडे फारसा उपयोग होत नाहीं. कारण, आरोग्यावस्थेत ही क्रिया (पचनक्रिया) वरील भागांतच संपून जाते. तथापि मोठ्या आंतड्याच्या अंगीं पचन करण्याची शक्ती मुळीच नाहीं, असें मात्र समजूं नये. ' दुखण्यामध्यें ज्या वेळीं तोंडावाटे अन्न देणें शक्य नसतें, त्या वेळीं पोषक अन्नाचा बस्ती देण्यांत येतो व त्या अन्नाचें मोठ्या आंतड्यांत पचनही होतें.