Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ आमानांत राहिलेले अवशिष्ट पदार्थ, ह्मणजे शिजविलेलें स्टार्चयुक्त अन्न, औजस अन्न व न शिजविलेलें स्टार्चयुक्त अन्न, यांवर अनामक पिंडरसाचें कार्य होऊन स्टार्चची साखर (माल्टोज) व औजसचें मांसघटक द्रव्य होतें. तसेंच अन्नाबरोबर खाण्यांत आलेल्या साखरेवर आंत्ररसाचें कार्य घडतें व त्याला रक्तांत मिळण्याजोगी स्थिति प्राप्त होते. नंतर तीं सर्व एकत्र होऊन जो रस होतो त्याला पक्ररस (Chyle) असें म्हणतात. या पकरसापैकीं साखर, मांसघटक द्रव्य, पाणी व क्षार हीं आंतड्याच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून यकृत् शिरेमध्यें जातात व तेथून यकृतांत शिरून त्यांची पुढील व्यवस्था आमाशयाच्या पचनक्रियेंत सांगितल्याप्रमाणें होते. तैलादि पदार्थाचा झालेला क्षीररस क्षीररसवाहिन्यांतून शोषण होऊन मोठ्या “क्षीररसवाहिनींत जातो. हा रस पाठीच्या मणक्याच्या बाजूनें मोठ्या क्षीररसवाहिनीवाटे वर आल्यावर मानेकडे डाव्या बाजूस जी शीर (Innominate Vein) जाते तींत ती (मोठी क्षीरसवाहिनी) ओतते. तेथून तो रस रक्ताशयाच्या उजव्या कप्यांत येऊन फुप्फुसांत मार्गे सांगितल्याप्रमाणें श्वासावाटे घेतलेल्या प्राणवायूच्या योगानें शुद्ध होऊन त्याचा सर्व शरीरास रताचे रूपानें उपयोग होती. पित्त आमानांत मिळून अन्नाचें पचन झाल्यावर,तें(पित्त)सर्व मलावाटे बाहेर पडत नाहीं. तर त्यांत असणारे पित्तक्षार व पित्तरंजक द्रव्यें हीं परत आंत्रांतून यकृतांत जातात. ह्या क्षारांची रुचि कडु असते म्हणून पित्ताचीही रुचि कडु लागते. हे क्षार अंगाला लावले तर त्वचेचा

  • अन्नरस हा रक्तांत जाण्यापूर्वी ज्या वाहिन्यांत शोषला जातो त्या वाहिन्यांचे अंगीं जी एक प्रकारची शक्ति असते, तिच्यामुळेच त्याला-अन्नरसाला-रत बनण्याची योग्यता प्राप्त होते. अशाच प्रकारच्या शक्तींनीं रत्तापासून मांस, शुक्रादि सप्तधातु तयार होतात. या शक्तींना आर्यवैद्यकांत मार्गे सांगितलेल्या जठराझिशिवाय सप्तधातूंचे सात अभि मानले आहेत.