ફ भागांवर जाठररसाचें कार्य होऊं लागतें. पाणी जिरविण्याची मुख्य जागा म्हटली म्हणजे लहान व मोठीं आंतडीं हीं होत, यावरून अन्नमार्गाच्या इतर भागांत पाणी मुळींच शोषलें जात नाहीं असें मात्र कोणीं समजूं नये; झाडांनां पाणी घालण्यासाठीं एखाद्या बागेत ज्याप्रमाणें पाटानें पाणी नेऊन सोईवार पडेल अशा मधोमध खोदलेल्या खडुष्यांत सोडण्यांत येतें व पाणी अशा रीतीनें खडुष्यांत येत असतांना पाटाला थोडथोडें जिरत जातें त्याप्रमाणें अन्नमार्गामध्यें तोंडांत पाणी घातल्यापासून तें लहान आंतड्यांत जाईपर्यंत होत असतें. मांसादि पदार्थाच्या पचनास धान्यादि पदार्थीपेक्षां कमी वेळ लागतो. कारण, मांसादि पदार्थ हे आरंभीं धान्यादि पदार्थीपासूनच बनलेले असतात. ह्मणजे धान्यादि पदार्थावर पुष्कळ संस्कार घडून मांस बनलेलें असतें. म्हणून मांसादि पदार्थीपेक्षां धान्यादि पदार्थास पचन होण्यास जास्त वेळ लागणें साहजिक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे कीं, मांसादि पदार्थीपेक्षां धान्यादि पदार्थ पचविण्यास जाठररस जास्ती लागतो. हें डॉक्टर पावली यांनीं कुत्रा वगैरे प्राण्यांवर प्रयोग करून सिद्ध केलें आहे. आमाशयामध्यें अज्ञांत होणारे फेरफार. अन्न मुखामध्यें अर्धवट पचन होऊन लाळेसकट जठरांत येऊन पडल्यावर तेथें लाळेची क्रिया १५-२० मिनिटांनीं बंद पडते. मुखांतून आलेल्या अर्धपक अन्नांत जाठररस मिळतो व ही मिळण्याची क्रिया जठराच्या भिंतीच्या हालचालीनें चांगली होते. जठराच्या अंगीं दोन प्रकारच्या क्रिया असतात. एक चालनाची व दुसरी मंथनाची. अशा रीतीनें अन्नावर चालनमंथनादि क्रिया सुरू होऊन अन्नांतील औजस (ग्रेोटीड) द्रव्याचें मांसघटक (पेप्टोन) द्रव्य तयार होतें. औजस द्रव्य रक्तांत मिळत नाही; परंतु मांसघटक द्रव्य मिळतें.
पान:अग्निमांद्य.pdf/28
Appearance