R vs लेलीं मुख्य द्रव्यें ह्मटलीं ह्मणजे लवणाम्ल (Hydrochloric Acid), पेप्सीन व रेनीन (याच्या योगानें दुधाचें दहीं बनते) हीं असून शिवाय कांहीं क्षार, पाणी व इतर कांहीं पदार्थ असतात. हा रस यांत असलेल्या लवणाम्लामुळेच आंबट असतो. याच्यामुळे औजस अन्नाचें पचन होतें. ज्या वेळीं आमाशयांत अन्न नसतें ह्मणजे आमाशय रिकामा असतो त्या वेळीं त्याचे आंतील आवरण किंवा भिंत ही फिकट व ओलसर असते, पण अन्न येतांच ती भिंत किंवा आवरण लाल होऊन त्यांतून जाठररस वाहूं लागतो. जाठररसोत्पति-जाठररस उत्पन्न होण्यास प्रथम मुखाला अन्नस्पर्श हें कारण होय. त्यानंतर तोंडांतून अन्न जाऊन त्याचा जठराचे अंतस्त्वचेस स्पर्श होतांच जाठररसोत्पादक पिंडांचा क्षोभ होऊन जाठररस उत्पन्न होतो. त्याचप्रमाणें गिळलेल्या अन्नांत लाळ मिसळलेली असल्यामुळे तिच्या आम्लप्रतियोगी गुणामुळे जाठररस उत्पन्न होण्यास मदत होते. तसेंच रसनेंद्रियांतील ज्ञानतंतूंचा क्षोभ झाल्यानेंहि जाठररस उत्पन्न होतो. शिवाय डोळे, कान व अन्नाचा वास यांच्या योगानें ला या ज्ञानतंतूमार्फत मेंदूला अनाची बातमी पोंचून लामुळें देखील अप्रत्यक्ष रीतीनें जाठररस तयार होतो. यामुळे जठराच्या खायूंनां उत्तेजन येऊन त्यांची हालचाल सुरू होते, जठराच्या भिंतींतील रुधिराभिसरणक्रिया जास्त जोरानें चालूं लागते व त्यामुळे रसग्रंथींचा क्षोभ होऊन जाठररस उत्पन्न होतो. प्रत्यक्ष अन्नाच्या स्पशनेिं व लाळेसारख्या आम्लप्रतियोगी पदार्थाच्या संयोगानें जाठररस उत्पन्न होण्यासाठीं ज्या मज्जातंतूचा उपयोग होतो त्याचा संबंध मेंदूची sągå joht, fGØT Medula oblongata, sqời ह्मणतात, तिच्याशीं असतो. हे मज्जातंतु दोन प्रकारचे असतात. एक संवेदक (Sensory) व दुसरे गतिदायक (Motor). जठरांत कांहीं गडबड झाल्यास तिची बातमी मेंदूला संवेदक मज्जातंतूच्या द्वारें पोहोंचते, व मग मेंदू वांड्यादिकरून जे कांहीं हुकुम करा २ अग्नि० ●
पान:अग्निमांद्य.pdf/26
Appearance