Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

89 निरनिराळ्या जातींच्या प्राण्यांत त्यांच्या उपयोगांत असलेल्या अन्नाप्रमाणें पाचकरसांची उत्पति व्हावी. येथें कोणी अशी शंका घेईल कीं, पाळलेल्या जनावरांस (उदाहरणार्थ; पोपट, गाई, वगैरे) आपण शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न घालतों, आणि तें तीं पचबून टाकतात हैं कसें ? याचें निरसन असें आहे कीं, शिजलेल्या स्टार्चयुक्त अन्नाशीं टायलीन्युक्त लाळ मिसळल्यानें तें जसें पच्चून जातें तसें तें टायलीन् नसलेली लाळ मिसळल्यानें पचत नाहीं. हें प्रत्यक्ष प्रयोगानें सिद्ध झालें आहे. मग हें शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न पचते कोटें? शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न त्यांच्या पोटांत पचतें, व आपण आपल्या प्रमाणेंच लाळेनें पचलें असें समजतों. मात्र एवढी गोष्ट खरी आहे कीं, ज्याप्रमाणें हा पदार्थ (टायलीन) आपल्या लाळेत, कांहीं काळानें कां होईना, उत्पन्न झाला, त्याचप्रमाणें जनावरांच्याही लाळेत तो जर आपण त्यांस शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न घालू लागूं तर खचित उत्पन्न होईल यांत शंका नाहीं. म्हणून ज्यांच्या अन्नांत शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न येत नाहीं त्यांचे लालापिंड पूर्णदशेस पोंचलेले नसतात. लाळेची क्रिया न घडतां स्टार्चयुक्त अन्नाचा जो कांहीं भाग तसाच गिळण्यांत येतो त्याची अनामकपिंडरसानें साखर होते, म्हणजे दोहोंच्याही (लालापिंड व अनामकपिंड) क्रिया स्टार्चयुक्त अन्नासंबंधानें एकच आहेत. असें जर आहे तर मग तोंडांत चर्वण करण्यांत वेळ कां घालवावा? त्यांचें कार्य करणारें इंद्रिय पोटांत आहेच. हा समज चुकीचा आहे. कारण, आपण अन्न न चावतां तसेंच गिळू लागलों तर तोंडांत अन्नाचें चर्वण होऊन पिष्ट झाल्यानें पुढील क्रिया घडण्यास जें सोपें पडतें तें न पडतां आमाशयाला फार त्रास पडेल व तोंडांत स्टार्चची जी कांहीं साखर झाली असती तो न होतां अनामकाला दुपट काम पडलू व त्या या इद्रयांना जास्त जास्त काम पडूं लागून त्यांनी साहजिक क्षीणता येऊँ लागेल, व ती मदावत जाऊन आपलें काम बरोबर करीतनाशीं होतील. ह्मणून तोंडांत अन्नाचें चर्वण चांगल्या