१३ लागत नाहीं. याशिवाय लाळेच्या अंगीं असा विशेष धर्म आहे कों, तिची क्रिया कांहीं स्टार्चयुक्त पदार्थोंवर ह्मणजे तांदूळ, साबुदाणे, तवकोर वगैरे पदार्थीवर होऊन त्यांतील स्टार्चची माल्टोजी नांवाची साखर बनते. या माल्टोज साखरेचे गुणधर्म जवळ जवळ द्राक्षशर्करेप्रमाणें असतात. अन्नांतील स्टार्चपासून साखर बनण्याची क्रिया लाळेत असणा-या टायलीन् नामक सहज मिळते. येथें एक गोष्ट सांगावयाची, ती ही कीं, आपण जी साखर खातों-मग ती उंसापासून, गाजरांपासून, अगर दुस-या कोणत्याही पदार्थीपासून केलेली असो-तिच्यावर देखील रक्तांत मिसळण्यासाठीं हा संस्कार व्हावा लागतो. ह्या लाळेच्या गुणामुळे खाण्याचा कोणताही स्टार्चयुक्त पदार्थ जरी घट्ट, चिकट व बेचव असला तथापि तोंडांत घालतांक्षणींच पातळ व रुचकर होतो. ह्मणजे लाळेच्या योगानें यांतील स्टार्चची साखर बनते. ही गोष्ट वनस्पत्याहारी प्राण्यांसंबंधानें झाली. परंतु जे केवळ मांसाहारी असतात त्यांच्या अन्नांत स्टार्चयुक्त पदार्थ येत नसल्यामुळे, लाळेचा त्यांनां केवळ मांसाचा मऊ व गिळण्याजोगा गोळा बनविण्यापलीकडे फारसा उपयोग होत नसतो; ह्मणून अशा प्राण्यांच्या (उदाहरणार्थ; वाघ, सिंह, वगैरे) लाळेत टायलीनू नसतें. ज्यांच्या अन्नांत शिजलेलें स्टार्चयुक्त अन्न येत नाहीं अशा प्राण्यांत (उदाहरणार्थ; घोडा) देखील मांसाहारी प्राण्याप्रमाणेंच टायलीन् नसतें. कारण टायलीन्हे शिजलेल्या स्टार्चयुक्त अक्षा (cooked starch) चेच पचन करूं शकतें. यावरून असें दिसतें कों, एका काळीं ज्या वेळीं आपण शिजविल्याशिवाय स्टार्चयुक्त अन्न खात होतों त्या वेळीं टायलीन् आपल्या लाळेत नसावें. व नंतर ज्या वेळीं आपण तें शिजवून खाऊं लागलों त्या वेळीं । ह्याची (टायलीन्) उत्पति होऊं लागली असावी. एकंदरींत नैसर्गिक हेतु असाच दिसतो कीं,
पान:अग्निमांद्य.pdf/20
Appearance