पान:अग्निमांद्य.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 R R पहिला प्रकारः-मलावरोध होत असेल अशा माणसानें उभे राहून आपलें धड उजवीकडे व डावीकडे फिरविणें; अगर धड पुढल्या बाजूतें किंवा मागल्या बाजूनें वांकविणें. दुसरा प्रकारः-सकाळीं उठल्यावर पोट चोळावें. पोट चोळण्यासाठीं हातांचा अगर एखाद्या धातूचे वाटोळे गोळे करून त्यांचा उपयोग करावा. हें चोळणें म्हणजे मोठ्या आंतड्याच्या सुरवातीपासून शेवटापर्यंत अशा दिशेनें असावें. यामुळे मलावरोधाचे माणसांस बरें वाटतें. किल्येकांना निजतांना अगर सकाळीं उठल्यावर गरम पाणी प्याल्यानें शौचास होतें. कांहीं लोकांनां सकाळीं थड पाणी (उष:पान) प्याल्यानें फायदा होती. शौचासाठीं रोज रोज जुलाब किंवा बस्ति घेऊं नये; कारण यामुळे संवय लागून पुढें पुढें त्याशिवाय शौचास होत नाहीसें होतें. नेहमीं । नेमलेल्या वेळीं मलशुद्धि करण्याची संवय ठेवावी.' मलाचा वेग आला म्हणजे तो दाबून टाकण्याची जी कित्येकांनां संवय असते ती त्यांनीं अगदीं सोडून दिली पाहिजे. ‘न वेगान् ” धारयेद्धीमान् जातान् मूत्रपुरीषयोः ?? शहाण्या माणसानें लघ्वीस किंवा शौचास (झालें असें) वाटलें असतां दाबू नये. (चरकसंहिता. सू० अ० ७ वा). वाग्भटानें तर मलमूत्रांचा वेग आला असतां अन्यकार्यात गुंतूं नये असें म्हटलें आहे (न _हेझिं यन्यकार्यः स्यातू) (वा. सू. अ० २ रा.) कित्येकांस `“सकेंगाळ विडी किंट्रः पङ्गुडी ओढल्याशिवाय मलशुद्धि होत नाही. मुंबईच्छेित् असु'हीत्र तंबाखूप्रमाणेंच कित्येकांस चहाचा गरम heSheTA0SEEESDD KSYDDD DDD DD DS DD DDD DDDD DDD "श्लष्णिाम होत.'-सी होतां होई तों साध्या उपायानें मलावरोध दूर होत असल्यास मोठ्या उपायाच्या भरीस पडूं नये. येथपर्यंत पचनमार्गामध्यें होणारीं लक्षणें व त्यांची चिकित्सा यांचा विचार झाला. आतां अपचनापासून सर्व शरीरावर घडणाया लक्षणांच्या चिकित्सेविषयीं विचार करूं.