पान:अग्निमांद्य.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R 0 o क्षुधामांद्य असेल तर तें ज्या कारणानें झालें असेल व्याप्रमाणें व्यवस्था ठेवावी. जर जाठररसांतील पेप्सीन् अपुरें तयार होत असल्यानें भूक लागत नसेल तर जेवणांत कांकडी, अननस किंवा पपई खावी. आमाशयाच्या अंतस्त्वचेंतील रुधिराभिसरण कमी झाल्यानें भूक लागत नसेल तर जेणेंकरून जाठररस तयार होईल व भूक लागेल असें अन्न द्यावें. उदाहरणार्थ-वरणाचें काट, मुगांचा सार, मांसरस वगैरे जेवणापूर्वी द्यावेत; मध्यें तित व कटु पदार्थ द्यावेत व जेवणानंतर आम्ल द्यावेत. तसेंच द्राक्षासव, पोर्ट वाईन वगैरे पदार्थाचाही कधीं कधीं उपयोग करावा लागतो. यामुळे अंतस्त्वचेंतील रुधिराभिसरण वाढतें, जाठररसोत्पादकपिंड उत्तेजित होतात व भूक लागते. जर रक्तांत विषारी द्रव्यें गेल्यामुळे त्यापासून क्षुधामांद्य असेल तर मूत्रल व रेचक औषधे द्यावींत. जर जीर्ण दाहामुळे कफ जमून त्यामुळे क्षुधामांद्य असेल तर तो कफ मार्गे सांगितलेल्या रीतीनें(पृष्ठ९५) काढून टाकावा. साखर, दारू, चरबी, फार तिखट व आम्ल मसालेदार पदार्थ, तसेंच मिट पदार्थ कमी करावेत. तसेंच या विकारांत सकाळीं गव्हांची भाकरी किंवा शिळा पाव खावा. ह्मणजे आमाशयांत जमून राहिलेला कफ त्याला लागून निघून जातो व मूळमळू उलटी वगैरे न होतां भूक लागण्यास दरें पड़तें. आकठ् जेबूं नये. अन्न हलकें, स्निग्ध झा! असावें. तसेंच खाण्याचे पदाथे व त्यांचा वास् आवडणॉरीं असावा. उदात्त्वं६. मत्स्यमांसादि पदार्थ खाणाच्या लोकांस जर या है::#श्वेत जात नाहसेिं होतें; निदान यांनां याचा ...थोडा तरी वास ‘प्त्तावा लागतो. परंतु वनस्पत्याहारी लोकांस त्याची घाँदेखील सहन होत नाहीं. जणूं काय त्या वासानें त्यांच्या जाठररसोत्पादक पिंडांनां आघातच होतो. यावरून आवडल्या पदार्थीचें किती महत्व असतें हें उघड होतें. यासाठीं ज्याला त्याला त्याच्या आवडीप्रमाणें अन्न घेणें हें अवश्य आहे. जेवणानंतर पपई, द्राक्ष;