R देऊनही चांगल्या नोकन्या मिळत नाहींत असें झालें आहे. जशी बरी वाईट मिळेल तशी नोकरी पतकरून वेळ अवेळ न पाहतां काम करावें लागत असल्यामुळे : जेवणाच्या नेहमींच्या ठराविक वेळा, चांगलें शिजलेलें अन्न, शुद्ध हवा, व्यायाम, स्वस्थता, गप्पागोष्टी, वाचन, अध्ययन, मन:प्रसन्नता, वगैरे अनेक गोष्टीनां मुकावें लागत आहे. संसाराच्या व नोकरीच्या जोखडाखालीं रात्रंदिवस खपावें लागत आहे. शारीरिक व त्याबरोबरच मानसिक शक्ती क्षीण होत चालल्या आहेत. या गरीबीमुळे चांगले. उबदार व आरोग्याला फायदेशीर असे कपडे घेण्याची ऐपत न राहिल्यामुळे स्वस्त. मिळतील तसे बरे-वाईट कपडे वापरावे लागत आहेत. गरीबांची अशी स्थिति - ह्मणून श्रीमंतांकडे पहावें तों त्यांनां देखील डेलते, खाणेंपिणें, स्वच्छता, चांगलें अन्न व हवा, वगैरे सर्व कांहीं - साधनांची अनुकूलता असतांही, जास्त द्रव्यतृष्णा लागल्यामुळे ह्मणा, किंवा शारीरिक श्रमांचा तिटकारा वाटत असत्यामुळे ह्मणा, अगर वाईट व्यसनें व दुष्ट संवयी लागल्यामुळे ह्मणा, त्यांचीही स्थिति खालावत चालली आहे. अशा रीतीनें गरीबांस व श्रीमंतांस दोहोंनांही हा शारीरिक व मानसिक क्षीणतेचा रोग ग्रस्तकरीत चालला आहे. या हें शरीरबल जें कमी होत चाललें आहे तें चांगल्या स्थितींत आणप्यासाठीं अनेक बाजंनों प्रयत्त झाले पाहिजेत, ही गोष्ट अगदीं निर्विवाद आहे. लोकांची सांपत्तिक स्थिति सुधारली पाहिजे; आयुष्यक्रमासंबंधीं बहुजनसमाजाच्या कल्पनांत फरक पडला पाहिजे; जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाली पाहिजे; सामाजिक चालीरीतींत फेर झाले पाहिजेत; अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांशीं हा महान् प्रश्न एकरूप झाला आहे, असें जरी आहे तथापि या गुंतागुंतींतील अतिशय महत्त्वाचा असा एक धागा तरी आपण मोकळा करून सोडावा अशी प्रबल भावना उत्पन्न झाल्यामुळे प्रस्तुत प्रयत हातीं घेतला आहे.
पान:अग्निमांद्य.pdf/10
Appearance