पान:अकबर.pdf/५०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६वाः ४३ मात्र की जिंकिलेल्या प्रांतांचे तुकडे करून तेथील कारभार आपल्या अनुयायी सरदारांकडे सोपवावा; त्यांनी वाटेल त्या रीतीने अंमल करावा; ते स्वतः खुद्द बादशहास जबाबदार असावयाचे. सबब, बाबराच्या अंतकाळी त्याच्या राज्यांतील निरनिराळ्या प्रांतांचे बंधन होतें तें येवढेच. आग्रा व लखनौ यांच्या राज्यपद्धतींत सारखें असें कांहींच नव्हतें; व हीच स्थिति दिल्ली व जोनपूर यांची होती. बादशाहीतील एका प्रांतांतील मालावर दुसऱ्या प्रांतांत निरनिराळ्या जबरदस्त जकाती असत, नणों काय ही निराळी स्वतंत्र राज्येच. शिवाय, ह्या प्रत्येक प्रांतांत भिन्न भिन्न जातींचे लोक राहत होते व ते सर्व बाबरच्या अंमलाखाली होते. येवढेच कायतें त्यांचे देशबंधुत्व. ह्यामुळे आपल्या अंतकाळी बाबराने जो प्रांतसमूह हुमायुनास ठेविला त्यांत एकोप्याचे किंवा समायिकतेचे एकही बंधन नव्हते. सारांश, त्याच्यापूर्वी जी मुसलमानी राजघराणी या देशांत होऊन गेली त्यांच्या राज्यवृक्षाची मुळे जशी हिंदुस्थानांत खोल व लांबवर रुझली नव्हती तशीच बाबर ह्याचे मरणसमयीं मोंगल घरा- ण्याची ही पण नव्हती. भाग साहावा. . -000- हुमायून-व अकबर याचे बालपण. ॥ कस्यै कान्तं सुखमुपगतं दुःखमेकांततो वा ॥ ॥ नीचे गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमिण ॥ ॥ कोणी अत्यंत सुखी ; शीपी अनिवार दुःख कोणाचे ; ॥ ॥ रथचक्रापरि फिरतें; खाली वर जाइ दैव मनुजाचें ॥ हुमायून हा हिंमतदार, रंगेल, विनोदी, सुशिक्षित, उदार, स्नेहेच्छू व कोमल अंतःकरणाचा होता व त्याचा स्नेह फारच हृदयवेधक होता. आणि ह्यामुळेच चिरस्थायी राज्य स्थापन करण्याची योग्यता बापापेक्षा त्याच्या अंगी कमीच होती. त्याच्या अंगी गुण होते त्या बरोबरच