Jump to content

पान:अकबर.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० भाग ५ वा. ४१ पराक्रमी पुरुषांत वावर ह्याची गणना उच्चपदच होईल. त्याच्या एकंदर आयुष्यांतील पराक्रम हे त्याच्या नैसर्गिक अलौकिक गुणांचेंच फळ होते. त्याची वडिलोपार्जित दौलत ह्मणजे मध्य एशियांत केवळ छायारूप असें एक लहानसें राज्य होर्ते. पण तोच बाबर, पूर्व पश्चिम कर्मनाशानदी- पासून ऑक्ससनदीपर्यंतच्या व दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून हिमालय- पर्यंतच्या मुलखांचा स्वामी बनला होता. त्याचा स्वभाव आनंदी होता. तो उदार, विश्वास ठेवणारा, व सदासर्वकाळ उमेद बाळगणारा असा असे. ज्यांच्यांशीं त्याचा संबंध घडे त्यांची प्रीति संपादन करण्याची हतोटी त्यास फारच उत्तम साधली होती. तो सृष्टीतील सौंदर्याचा उत्तम ग्राहक होता. त्यानें आपली नैसर्गिक अलौकिक बुद्धि परिश्रम करून इतकी वाढविली होती कीं त्याचें ज्ञान त्यावेळेस असाधारणच मान- ण्यासारखें होर्ते. तो प्रबल मनोवृत्तीचा होता व त्याची कल्पनाशक्ति ही फार विशाल होती. संग्राम, जयश्री, व वैभव यांची त्यास फार आवड असे ; तथापि शांतीच्या समयींच्या कलाकुशलतेकडे त्याचें दुर्लक्ष नव्हते. जिंकलेल्या लोकांचा समाचार घेणें हें बाबर आपलें पहिर्के कर्तव्य मानी व त्यांची स्थिति सुधारण्याकरितां योग्य उपायांची योजना करी. बागबगीचे, शिल्पशास्त्र, व गायनकला ह्यांचा तो फार शोकी असे. त्याची कवित्वशक्ति ही सामान्य नव्हती. परंतु त्याच्या स्वभावांतील अत्यंत प्रशंसनीय गुण हाटला ह्मणजे, जो हैदर मिरझा यानें आपल्या तारीखी रशीदी नामक ग्रंथांत वर्णिला आहे तो. हैदर मिरझा यास बाबर याचे स्वभावाची व गुणांची पूर्ण ओळख होती. त्याने लिहिलें आहे कीं त्याच्या सर्व गुणांत पहिले गुण दोन :- एक त्याची उदा- रता व दुसरा त्याची भूतदया. देश जिंकण्यापुरतीच जरी त्याची आयुर्म- र्यादा होती व जिंकिलेल्या देशांत स्थिरस्थावर करण्यास जरी त्यास अवकाश मिळाला नाहीं तथापि जिंकण्याचे काम याहून पवित्र पुरुषाच्या हातीं कचितच आले असेल. 6