पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रसिद्ध आहेत; जगभरातून त्यांच्याकडे सोन्याचा व पैशाचा ओघ वाहत असतो.
 पण ह्या उद्योगांपुरती व संपत्तीपुरती ह्या देशाची ख्याती सीमित नाही. गेली सात-आठशे वर्षे ह्या देशात लोकशाही अखंड टिकून आहे. ह्या देशावर त्या प्रदीर्घ कालावधीत अन्य कुठल्याही देशाने राज्य केलेले नाही. इथला सर्वसामान्य नागरिकही कमालीचा लढवय्या व स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. अठरा वर्षांवरील प्रत्येकाला लष्करी शिक्षण घेणे व किमान दोन वर्षे लष्करात काम करणे सक्तीचे आहे. शिवाय, आवश्यक ती शस्त्रे त्याच्या घरीच असतात व अवघ्या चोवीस तासांच्या अवधीत तो लष्करी कामासाठी सुसज्ज होऊ शकतो. सगळा युरोप पादाक्रांत करणाऱ्या हिटलरलाही ह्या टीचभर देशावर आक्रमण करायची कधी हिंमत झाली नव्हती. स्वित्झर्लंड देश बहुतांशी डोंगराळ. त्यात पुन्हा थंडी कडाक्याची. स्वतःकडे खनिजसंपत्ती अशी जवळजवळ अजिबात नाही. असे असूनही आज हा देश इतका समृद्ध बनला आहे कारण काटक कष्टाळू समाज व प्रगतिपूरक शासकीय धोरणे. विशेष म्हणजे जनता शस्त्रसुसज्ज असूनही या देशाने कधीच अन्य कुठल्या देशावर आक्रमण केलेले नाही.
 आपली अलिप्ततादेखील ह्या देशाने कटाक्षाने जपली आहे. त्यामुळेच युनायटेड नेशन्सच्या रेड क्रॉस, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे तब्बल २५ संस्थांची मुख्यालये आज ह्या देशात आहेत. लीग ऑफ नेशन्स ही पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संस्था म्हणजे आजच्या युएनचे मूळ रूप: तिचेही मुख्यालय जिनिव्हा हेच होते. जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत आंतरराष्ट्रीय शहर मानले जाते; पण देशाची राजधानी मात्र बर्न ही आहे.
 स्वित्झर्लंडची विभागणी वेगवेगळ्या २६ कँटोन्समध्ये झालेली आहे व प्रत्येक कँटोन बऱ्यापैकी स्वायत्त आहे. देशात ६४ टक्के जर्मनभाषक व सुमारे २३ टक्के फ्रेंचभाषक आहेत. ह्याशिवाय छोट्या प्रमाणात ८ टक्के इटालियन व अगदी छोट्या प्रमाणात रोमांश ह्या दोन भाषाही बोलल्या जातात. जिनिव्हा फ्रेंचभाषक आहे, तर राजधानी बर्नमध्ये जर्मन भाषा बोलली जाते. पण आश्चर्य म्हणजे, सर्व युएन संस्थांमध्ये दैनंदिन व्यवहाराची भाषा फ्रेंच हीच त्यावेळी होती. जोशींना फ्रेंच चांगले येत होते व ही नोकरी त्यांना मिळण्यामागे ती एक जमेची बाजू मानली गेली होती.

 १९६८ ते १९७६ ही आठ वर्षे जोशींनी इथे काढली. पण त्या काळाबद्दल अनेकदा प्रश्न विचारूनही जोशी विशेष काही माहिती पुरवू शकले नव्हते. तो सारा काळ जणू आता त्यांच्या विस्मृतीतच गेला होता. त्याकाळातील तुमचा कोणी सहकारी आज मला भेटू शकेल का?' ह्या प्रश्नालाही त्यांचे उत्तर सुरुवातीला नकारार्थीच होते.

 तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. त्यांची मोठी मुलगी श्रेया सहकुटुंब स्वित्झर्लंडला जाणार होती व त्या भेटीत ते सर्व जोशी यांच्या तेथील एका जुन्या सहकाऱ्याकडे व शेजाऱ्याकडे राहणार होते. ह्या सहकाऱ्याबरोबर सर्व जोशी कुटुंबीयांचेच एकेकाळी खूप जवळचे संबंध होते, असेही त्यांच्या बोलण्यात आले. “मी त्या सहकाऱ्यांना

डोंगरकुशीतल्या नंदनवनात६१