पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि
मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला.
 पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा
माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात.
एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो.
 ज्या दिवशी हे लक्षात आले, त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार
झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली. आजपर्यंतच्या
इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची
आहे.

- शरद जोशी
६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा