पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जोशी यांना राजकारणात अपेक्षित यश का मिळाले नाही याचे विश्लेषण अनेक विचारवंत आपापल्या परीने करतीलच; पण सरतेशेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, की जोशींचे राजकारण हा सकृतदर्शनी जरी त्यांच्या एकूण कारकिर्दीतील सर्वांत असमाधानकारक भाग वाटला, तरी त्याचे प्रमुख कारण ते आपल्या काळाच्या खूप पुढे होते हे असावे. ते मांडत असलेले स्वतंत्रतावादी विचार आजही आपल्या समाजात स्वीकृत झालेले नाहीत. त्यांनी राजकारणात पडायचा क्षण अजून पन्नास वर्षांनी आला असता, तर त्यावेळच्या बदललेल्या समाजाने कदाचित त्यांना अधिक यश दिले असते.
















राजकारणाच्या पटावर३४५