पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आलेलाही इथे काहीसा दबून जातो, मग ग्रामीण पंजाबातून आलेल्या शेतकऱ्याला हे शहर म्हणजे परदेशासारखेच वाटले तर नवल नाही. चंडीगढमध्ये आंदोलक शेतकरी आल्यावर ही तेढ लगेचच त्यांच्या नजरेत ठसठसू लागली होत

 पंजाबमधील परिस्थिती इतकी स्फोटक बनली ह्याबद्दल अनेक जण इंदिरा गांधींना दोषी ठरवतात. त्यांनीच अकाली दलात फूट पडावी म्हणून जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारख्या अतिरेक्यांना उभे केले; असेही म्हटले जायचे. जोशी हे अमान्य करतात. ते म्हणतात,

 या म्हणण्याइतके सत्यापासून ढळणारे काही असू शकत नाही. मलातर पंतप्रधानांच्या जागी, स्वतंत्र व्यक्तिमत्व नसलेल्या निर्बुद्धांच्या गराड्यात सापडलेली, आपल्या नेतृत्वाखालील देश भयानक वेगाने विनाशाकडे वाहत आहे हे पाहणारी आणि ते थांबवण्यास आपण असमर्थ आहोत या जाणिवेने भयग्रस्त झालेली एक एकाकी, असहाय स्त्री दिसते. इतका उत्पात घडवण्याइतकी अफाट शक्ती एका व्यक्तीच्या हाती बहाल करून सर्व दोष पंतप्रधानांच्या माथी मारणे म्हणजे केवळ राजकीय डावपेच आहे.

परीकथा ऐकण्यात रमणाऱ्या बालकाप्रमाणेच कोणत्याही प्रश्नामागे एखादे खलनायकी व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे असा विश्वास ठेवणे आपल्याला पसंत पडते – मग तो खलनायक कधी एखादा रावण, कंस, जीना, इंदिरा, झैलसिंग तर कधी भिंद्रनवाले यांच्या रूपाने जन्मलेला असतो! गोष्टीत खलनायक दूर झाला, की तो प्रश्न दूर होऊन सगळीकडे आनंदीआनंद होतो. किती सुटसुटीत आणि सोयीस्कर! मग किचकट आर्थिक व सामाजिक कारणांचा विचार करण्याची गरजच उरत नाही.
नोव्हेंबर ८२पर्यंत पंजाबमध्ये कुठेही जातीय स्वरूपात ध्रुवीकरण झालेले नव्हते हे मी अनुभवले आहे. हे मी ठामपणे म्हणू शकतो. तेथे जातीजातीत अजिबात अर्धवट शीख शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखे वागवीत आणि शीख शेतकऱ्यांनाही या शहरी व्यापाऱ्यांच्या खोटेपणाबद्दल व कपटीपणाबद्दल स्वाभाविक तिरस्कार होता. हरियानातील जाट-लाला संबंध किंवा महाराष्ट्रातील मराठे-ब्राह्मण संबंध यासारखेच पंजाबमधील शीख-हिंदू संबंधांचे स्वरूप होते. संपूर्ण देशभर ग्रामीण शेतकरी आणि शहरी नागरिक यांचे संबंध याच प्रकारचे राहिले आहेत. त्यांचे परस्पर आर्थिक हितसंबंध तत्त्वतः संघर्षात्मकच राहिले आहेत.
उद्योगधंद्यासाठी लागणारे भांडवल जमा करण्यासाठी मुख्यत्वे शेतीमालाच्या किमती कमी ठेवून वरकड उत्पन्न निर्माण करणारे शासनाचे जे धोरण आहे, तेच

अटकेपार२७७