पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अनेक बाबतीत शिखांना इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. पंजाबमधील नद्या आणि कालवे यांतील पाणी मुख्यतः हिमाचल प्रदेशातून येते व तिथल्या विजेसाठी लागणारा कोळसा मध्यप्रदेशातून येतो. बाहेरून येणाऱ्या या वीज व पाण्याअभावी पंजाबची अर्थव्यवस्था कोसळून पडेल. जवळजवळ २० लाख शीख पंजाबबाहेर राहतात व त्यांनाही आपापल्या व्यवसायासाठी तेथील बव्हंशी हिंदूंवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शीख व हिंदू ह्यांच्यातील ऐक्यातच पंजाबचे व तेथील शिखांचे कल्याण सामावलेले आहे. दुर्दैवाने भावनेच्या भरात शीख हे परस्परावलंबित्व विसरतात. हिंदू-शीख ऐक्य वाढवण्याची म्हणूनच आज सर्वाधिक गरज आहे.

हाच धागा घेऊन चंडीगढ आंदोलनाच्या संदर्भात अय्यर पुढे लिहितात,

There is reason to be optimistic on this score because of the close co-operation between Sikhs and Hindus in the recent farmers' agitation in Punjab. The president of the Kisan Union, Mr. Bhupinder Singh Mann, and many other office-bearers are Sikhs. But they speak for Hindu as well as Sikh farmers and inducted the services of Mr. Sharad Joshi, a Hindu from Maharashtra, for pressing their demands. They gheraoed Raj Bhavan in Chandigarh and given the trouble in Punjab, the predominantly Hindu population of Chandigarh was initially alarmed by the invasion of the city by farmers, who pitched camps on public places. But it rapidly became clear that the farmers were a highly disciplined lot who took great precaution to ensure that the agitation was non-violent, thanks in part to Mr. Sharad Joshi's organizational abilities. They were soon playing with the children of the Hindu parents and there were warm hugs and embraces between members of the two communities. It was an education for both sides to chat and leam of each other's problems. Not even Holi revelry with all its unpredictability, affected the show of comraderie. The farmers, used to informal ways of dropping in on neighbours, soon won the hearts of Chandigarh urbanites.

(पंजाबमधील अलीकडच्या शेतकरी आंदोलनात हिंदू व शीख ह्यांच्यात जे निकटचे सहकार्य दिसले, त्यामुळे ह्या आघाडीवर आशावादी राहणे सयुक्तिक ठरेल. किसान युनियनचे अध्यक्ष श्री. भूपिंदरसिंग मान व इतर अनेक पदाधिकारी शीख आहेत. पण ते शिखांप्रमाणेच हिंदूंच्याही वतीने बोलत आहेत व आपल्या मागण्या पुढे रेटण्यासाठी त्यांनी श्री. शरद जोशी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील एका हिंदूचे सहकार्यही घेतले आहे. त्यांनी चंडीगढमधील राजभवनला घेराव घातला, तेथील

२७०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा