पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/११०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


संकल्पनेत नेमके उतरले होते. त्यात केवळ वैचारिक पातळीवरचे आकलन नव्हते; भावनांचे उत्कट गहिरेपणही होते. त्यात व्यक्तिशः आपल्या होत असलेल्या अवहेलनेचा दंशही होता; त्या 'इंडिया'वासींमुळे आपल्यासारख्या 'भारत'वासींना सोसाव्या लागणाऱ्या लाचारीविषयीचा संतापही होता.
 म्हणूनच त्यांची नेहमीची हुकमी झोप आज त्यांना सोडून गेली होती. 'इंडिया विरुद्ध भारत'चे वादळ डोक्यात सतत घोंघावू लागले होते.

११०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा