पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२)

लेखणीने जे काम निबंधाच्याद्वारे करितात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार" असे हरिभाऊ आपल्या उद्दिष्टांचे मुख्य सुत्र सांगतात. सामाजिक प्रबोधन आणि लोकरंजन हे मुख्य हेतू बाळगून 'करमणूक' पत्र हरिभाऊंनी चालवलं. वाङ्म़यीन नियतकालिकाला आपले तात्त्विक धोरण असायला हवे आणि अशी तात्विक बैठक असल्याशिवाय वाङ्म़यीन नियतकालिकाला उत्तम दर्जा प्राप्त होत नाही. आज मराठीत जी वाङ्म़यीन नियतकालिके आहेत त्यांना तात्त्विक बैठक नाही म्हणून या सर्व नियतकालिकांना दूरदर्शनवरील 'चित्रहारां'ची कला लाभली आहे. साहित्य संशोधन, साहित्यातील नव्या प्रवाहामागील कारणमीमांसा, साहित्यविचार; साहित्यविषयक प्रश्न, वाङ्म़यीन अभिरूचीचा अभ्यास इत्यादींचा समावेश वाङ्म़यीन नियतकालिकात असायला हवा पण आजच्या मराठीतील वाङ्म़यीन नियतकालिकाना निश्चित दिशा नाही आणि त्यांना वाङ्म़यीन अभिरूचीचे पोषणही करता येत नाही हरिभाऊ म्हणतात,"जी गोष्ट जनसमूहाने अवश्य करावी म्हणून केसरी, सुधारक एखाद्या कठोर पित्याप्रमाणे कठोर शब्दाने सांगणार व समाजाचे प्रशस्त वर्तन झाल्यास वेळीच वाग् प्रतोदाचे तडाखे लगावणार. तीच गोष्ट हे पत्र प्रेमळ मातेप्रमाणे गोड गोड शब्दांनी व चांगल्या चांगल्या गोष्टींनी अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचे शासन करणार, एवढे मात्र ध्यानात ठेवावे. की हे पत्र आचरट आईप्रमाणे फाजील लाड करणार नाही." हरिभाऊंनी वाचकांना बजावले होते की, त्यांना आचरट, पाचकळ आणि फाजील मजकूर वाचायला मिळणार नाही. कारण हरिभाऊंनी वाङ्म़यविषयक भूमिका स्पष्ट करताना म्हटले होते.-

"(त्यास) वाचकास मनुष्यत्त्वांकडून काढून देवत्वाकडे जाण्याबद्दल उत्सुक करून त्या मार्गाला सन्मुख करणारे - असे जे कोणाचेही अंतःस्फूर्तीने शब्दरूप घेऊन मुखावाटे बाहेर पडलेले किंवा लेखणीने लिहून ठेवलेले विचारोद्ग़ार त्या सर्वांना समुच्चयाने वाङ्म़य ही संज्ञा आहे."

 समाजाचे दोषदिग्दर्शन करणारे लेखन करणे हे जसे लेखकाचे काम आहे तसेच त्यावर उपाय व योजना सुचवणे हेही त्याचे काम आहे. ही असली भूमिका हरिभाऊंनी कथा-कादंबऱ्या लिहिताना स्वीकारलेली आहे. करमणूक हे लोकांचे रंजन करून प्रबोधन करण्यासाठी काढलेले एक कौटुंबिक सद्भ़िरुचिसंपन्न नियतकालिक होते, हा डॉ. गिरधारी यांचा अभिप्राय कुणालाही मान्य होईल.

 हरिभाऊंनी करमणुकीतून जे कादंबरी लेखन केले त्याचा परिचय प्रस्तुत वाङ्म़यीन अभ्यासात आहे. हरिभाऊंच्या सामाजिक कादंबरीतून जे जीवनदर्शन घडते ते पांढरपेशा मध्यमवर्गाचे! म्हणून तर त्यांच्या कादंबरीला 'सदाशिव पेठी' असे संबोधले जाते. " पण लक्ष्यात कोण घेतो." या कादंबरीत जे सदाशिवपेठेतील पांढरपेशांचे मध्यमवर्गीय कुटुंब आपल्यासमोर उभे राहते त्या कुटुंबात यमूचे जे दुःख आहे, ते स्त्री जातीचे दुःख आहे. कलाकृतीतील अनुभव विशिष्टतेचे कवच फोडून अधिक व्यापक होत असतो. सर्वस्पर्शी होतो. वज्राघात ही ऐतिहासिक कादंबरी ही केवळ ऐतिहसिक नाही तर तिला एका चांगल्या शोकात्मिकेचा दर्जा