पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाविषयी थोडेसे -

 डॉ. भास्कर गिरधारी हे गोखले एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य असून या संस्थेच्या कला आणि वाणिज्य जव्हार (जि.ठाणे) महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष असून विद्वतसभा, अधिसभा, कलाशाखा, बहिःशाल शिक्षण मंडळाचे ते सदस्य आहेत. लेखक, वक्ते आणि समीक्षक म्हणून ते सुपरिचित असून त्यांचे ५ समीक्षा ग्रंथ, ३ संपादित पुस्तके आणि शेकडो अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित आहेत. काही लेख विविध ग्रंथात समाविष्ट झालेले आहेत. प्रमुख मराठी नियतकालिकातून ते सतत लेखन करतात. काही पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान त्यांना लाभले आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यक्रम सादर झाले आहेत. महाभारत आणि आदिवासी लोकसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे आणि खास चिंतनाचे विषय आहेत. विविध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय संस्थांचे ते सदस्य आणि सक्रीय कार्यकर्ते आहेत.


_____________________________________________ सन्मार्ग प्रिंटिंग प्रेस, अलिबाग-रायगड.