पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 


 कर्तबगारीने सार्वजनिक हित करून दाखविणाऱ्यासच अमेरिका मोठे मानते. आत्मविश्वास आणि स्वकर्तृत्त्व फुलविण्यासाठी असे चरित्र सादर केले गेले. याखेरीज 'भूषण कवी', 'महाराणी स्वर्णमयी', 'राजा अशोक वर्धन', 'विद्यापती', 'रामकृष्ण', शीख लोकांचे महापुरुष १) 'गुरू नानक' २) 'गुरू गोविंदसिंह' ३)'गुरू रणजितसिंग' ४)'सती कोरम देवी' इ. अनेक चरित्र करमणूकीतून प्रसिद्ध झाली पण या चरित्र लेखनाचे स्वरूप व्यक्तिविषयक तपशीलवार माहिती देणारे होते त्यात कलात्मक चरित्र लेखनाचा दृष्टिकोन फारसा (बोधरूप स्वरूप असल्याने) आढळत नाही.

 ४ नोव्हे, १९०५ च्या अंकात पुस्तक कसे वापरावे हेही विस्ताराने सांगितले आहे.

 १) जाडकागदाचे कव्हर घाला, २) आतील मुख्यपृष्ठावर नाव टाका, ३) पाने बांधून नसल्यास घ्यावीत. ४) पुस्तक कामापुरते काढून पुन्हा जागेवर ठेवावे. ५) स्वच्छ ठेवावीत, हाताळणी असावी. ६) उजव्याबाजूच्या वरील कोपऱ्याकडून अंगठया जवळच्या अथवा मधल्या बोटाने पुस्तकाची पाने उलटावीत, ७) बोटास थुंकी लावू नये. ८) पुस्तकाची खूण म्हणून पाने मुडपणे, जाड पेन्सील वा वस्तू खूण म्हणून ठेवणे. पुस्तक उघडेच पालथे मारणे वाईट. ९) बुकमार्क किंवा कागद घालावा. १०) उशाशी घेऊ नये. ११) पुस्तके दुसऱ्यास देऊ नये.

V) काही मौजेच्या व चमत्कारिक गोष्टी-

 संपादकांनी मोठया गमतीशिर अशा पुढील गोष्टी निःसंकोच मांडल्या आहेत.

 १) 'करमणूक'ची पुरवणी ज्याला पाहिजे त्यालाच फक्त मिळेल.
 २) १ रु. ची २० बक्षीसे लॉटरी पद्धतीने वर्गणीदार क्रमांकावर ठेवण्यात आली होती.
 ३) वर्गणीदार होणाऱ्या वाचकास एक रोजनिशी भेट मिळत असे.
 ४) 'वक्ष भागापर्यंतच्या तसबिरी' हे पासपोर्ट साईझ फोटोचे भाषांतर होते.
 ५) 'महाभारत' घेणारास 'रामायण' फुकट अशी एक जाहिरात आहे.

VI) काही विनोदी किस्से- .


 करमणूकमधून अतिशय दर्जेदार व मोकळेपणे हसविणारे किस्से, चुटके आलेले आहेत, त्याचा मासला पुढे पेश केला आहे.

 १) रशियात 'काय भयंकर थंडी आहे' म्हटल्याने एका भारतीय माणसाला पोलीस तंबी देतो, कारण त्याला वाटते हा रशियालाच नावे ठेवतो. म्हणून 'अगदी बोलू नका' हेच रशियात बरे.