पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

विज्ञान, रसायन, अर्थशास्त्र शिवाय शास्त्रीय मनोरंजक माहिती असे विपुल साहित्य वाचकांना एक मेजवाणी म्हणूनच 'करमणूकी'ने दिले. चित्रे देऊन लेख व गोष्टी मनोरंजक पद्धतीने सजविण्याचा प्रयत्न केला तो कालमानाने यशस्वी होता असे म्हणावे लागेल.

 मधुर स्वप्ने, ज्ञानाचे कण, मुलांची करमणूक, स्त्रियांस करमणूक, आमच्या देशाच्या गोष्टी, शास्त्रीय करमणूक, विश्वकुटुंबातील मंडळीची ओळख, मुलांसाठी कूट प्रश्न, थोरांचे बोल, सुवर्णकण विचार मधुकरी, साहित्य चर्चा, अशा नानाविध नवीन संदरांनी वाचकांना करमणुकीबरोबरच ज्ञानही मिळाले.

 म्हणूनच मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाने 'करमणूक'ला सतत उचलून धरले, पाठिंबा दिला. मान्यवर जाणकार साहित्यज्ञ रसिकांनी उत्तम दाद दिली. आ. ज. का. तेलंग, पंडिता रमाबाई, प्रा. वा. बा. केळकर, रमाबाई रानडे, काशीताई कानिटकर, सरस्वतीबाई पंडित, सौ. शिरगावकर, आत्माराम नुलकर, रा. रा. दि. ह. वाकनीस, प्रि. वा. शि. आपटे यांनी पत्रे व अभिप्राय पाठवून 'करमणूक' पत्राची वाखाणणी केली. थोराप्रमाणेच सर्वसामान्य वाचकांचीही या करमणूक पत्राला उत्तम साथ लाभली. वाचक उत्कंठेने जिज्ञासेपोटी पुढील अंकाची प्रतिक्षा करीत होता. शेकडो शाळांचे कार्य एकट्या 'करमणूक' पत्राने करून दाखविले असे म्हणतात. अनेक स्त्रियांना लिहिते करून स्त्री लेखिकाही निर्माण केल्या. स्त्री शिक्षण आदि वाङ्म़याच्या क्षेत्रातीलही या पत्राने केलेली भरीव कामगिरी म्हणावी लागेल. हरिभाऊंच्या प्रकृति धर्माप्रमाणे सौम्य, भावसुडानं, सात्विक, सोज्ज्वळ, मर्यादाशील, विशुद्ध विचारांनी युक्त ही आपली जनमानसातील प्रतिमा करमणूक ने अखेरपर्यंत टिकवून ठेवली हे खास वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.

करमणुकीतील 'कादंबरी'-

 कादंबऱ्यांचे उद्दिष्ट या लेखात हरिभाऊंनी 'कादंबऱ्यांचा उद्देश मनोरंजन हा आहेच, पण त्याबरोबरच समाजाला सद्ब़ोध करून त्यास सन्मार्गास लावण्याचे सत्कार्य कादंबऱ्यांच्या हातून होणे जरूर आहे' असे नमूद केले आहे. त्यांच्या या विचाराचा प्रत्यय त्यांच्या कादंबऱ्यांतून येतो.

 करमणुकीच्या १ ल्या तपात हरि नारायण आपटे यांच्या सामाजिक व ऐतिहासिक मिळून एकूण आठ कादंबऱ्या दिल्या. त्यात 'पण लक्षात कोण घेतो,' 'म्हैसूरचा वाघ' 'मी,' 'भयंकर दिव्य' 'रूपनगरची राजकन्या' यांचा समावेश होता. १८८८ सालीच हरिभाऊंनी आपण 'करमणूक ' काढून पुढे हयातभर कादंबरी