पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
१७
 

असा अनेक लेखक, साहित्यिक, विशेषत: कवींना करमणूकीने वाव दिलेला आहे. त्या-त्या संदर्भात हे उल्लेख पुढे केलेले आहेतच.

 रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर व हरिभाऊंची मानलेली बहिण काशीताई कानिटकर यांच्याशी हरिभाऊंची बौद्धिक व वाङ्म़यीन स्वरूपात मैत्री होती. त्यांच्यातील पत्रव्यवहार उद्बोधक आहे. एकाचवेळी विविध ठिकाणी हरिभाऊ लेखन करीत असले तरी करमणुकीचे वर्गणीदार, छपाई टापटीप, अचूक हिशेबीपणा यासाठीही ते भरपूर लक्ष पुरवित. हरिभाऊंनी 'नव्या वर्षाचा नवा अंक, तेव्हा यात एक नाटक, एक प्रहसन, एक कादंबरी व एक निबंध असलीच पाहिजेत' असे उल्लेखिले आहे. म्हणजेच करमणूक हे नाव कादंबरी, कथा, कविता, यांच्या विकासात महत्त्वाचे मानले गेले. त्याचे श्रेय हरिभाऊंच्या या विदग्ध वाङ्म़य दृष्टीला आहे. 'करमणूक 'चे मुखपृष्ठ आजवर उपलब्ध नियतकालिक ग्रंथात समाविष्ट झालेले आढळत नाही. तथापि 'दर्पण', 'प्रभाकर', 'ज्ञान प्रकाश', 'मुंबई अखबार', 'ज्ञानोदय', 'इंदु प्रकाश', 'केसरी', 'सुधारक', 'करमणूक ', 'काळ' या मालिकेतील, 'ज्ञान प्रकाश', इंदु प्रकाश', 'केसरी', सुधारक ' ' करमणूक' आणि 'काळ' या सहा वृत्तपत्रांचा गौरवपूर्ण उल्लेख वृत्तपत्रांच्या इतिहासात निरंतर केला जाईल असा भक्कम अभिप्राय मराठी नियतकालिकांचे इतिहासकार रा. गो. कानडे यांनी दिलेला आहे. (पान ५०) त्यांनी नामनिर्देश केलेल्या ६ नियतकालिकात हरिभाऊंचे 'करमणूक ' आहे हे विशेष! पुढे ते म्हणतात,

 "कै. हरिभाऊंची 'करमणूक' बृहन्महाराष्ट्रीय जनतेत अत्यंत लोकप्रिय झाली होती. करमणुकीतील निरनिराळ्या लेखांचे संग्रह फार लोकप्रिय झाले आहेत. ही एकच गोष्ट करमणुकीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारी आहे. करमणुकीचे अनुकरण करणारी अनेक वर्तमानपत्रे निघाली, पण त्यापैकी एकासही करमणुकीची सर आली नाही.".

(पान ४८)

 तात्पर्य मनोरंजन आणि ज्ञान यांचा मनोज्ञ मेळ करमणुकीने घातला. त्यामुळे अनेकविध विषयांवर कुटुंबातील सर्वांना उपयुक्त असा मजकुर देणारे हे साप्ताहिक अल्पावधीत लोकप्रिय झाले शरीरशास्त्र, सृष्टिशास्त्र व ज्योतिषशास्त्र विषयक लेखन आणि वाढती नवी नवी सदरे हे करमणूकचे आकर्षण होते.

 जसजसा कालावधी उलटला तसतसे करमणुकीचे वाङ्म़यीन स्वरूप अधिकाधिक मनोहर होत गेले. त्यातील ' लडिवाळ गोष्टी', 'गोड गाणी 'इत्यादींनी वाचकवर्ग अगदी वेडावून गेला. एका तपाच्या अवधीत ८ कादंबऱ्या, ४०० लहान चटकदार गोष्टी, ४०० मनोहर, अभिरूची संपन्न करणाऱ्या कविता दिल्या. पदार्थ