पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
१३
 

इच्छिणारे सज्जन हो, विजया दशमीचे आत 'कुळकर्णी आणि मंडळी' कडे आपली नावे व पत्ता लिहून पाठवा. एक हजार वर्गणीदार असल्यास हे पत्र विजया दशमीच्या महुर्तावर पुढले शनिवारपासून सुरू होईल. तोपर्यंत फक्त सह्या पाठवा."

(करमणूक/ दिनांक १ नोव्हेंबर, सन १८९०, पान १०)

 १८८६ साली सुरू झालेल्या मनोरंजन'चे चालक हरिभाऊ होते, त्यांचा उद्देश 'करमणूक' सारखाच होता. 'यात येणारे विषय शिक्षणाचा मुख्य उद्देश धरून जितके मनोरंजक व प्रतिष्ठित करता येतील तितके करण्याचा आमचा विचार आहे.' यावरून हरिभाऊंच्या संपादकत्वाचा कौल कळतो. करमणूक लोकांचे रंजन करून प्रबोधन करण्यासाठी काढलेले हे एक कौटुंबिक सद्भिरुचिसंपन्न नियतकालिक होते.

 टिळक आणि आगरकरांची राजकीय, सामाजिक कार्याची चळवळ या काळात ऐनभरास होती. अशा काळात 'करमणुक 'चा उद्देश आणि कार्य काहीसे विसंगत वाटल्यास नवल नाही. पण करमणूकचा उद्देश हेच कार्य सौम्यपणे करण्याचा होता. त्यात सामाजिक सुधारणांचा लेखनातून पुरस्कार होता, पण रंजकतेवर सारा भर आणि लालित्यालाच प्राधान्य होते. वाङमयीन विकासाच्या दृष्टीने ही इष्टापत्तीच म्हटली पाहिजे. वस्तुतः हरिभाऊंनी ज्ञानप्रकाशाचे काम केले सुधारकातही लिहिले. समाजाला अनुकूल करण्यासाठी त्यांचे अज्ञानपटल दूर सारण्यासाठी त्यांचे कार्य होते. १८८१ ते १९२० पर्यंत केसरीचा प्रभाव होता, पण केसरीचा केवळ राष्ट्रवादी विचारांनी भरलेला मार्ग 'करमणूक' ने स्वीकारला नाही. केवळ देशभक्तीची छाप करमणूकवर दिसत नाही, याचा अर्थ कालप्रवाहापासून अलिप्त असे हे साप्तहिक सांस्कृतिक आणि वाङ्मयीन होते. याच सुमारास इंदुप्रकाश, ज्ञानप्रकाशचे सामाजिक सुधारणेचे कार्य आगरकरांच्या पश्चातही चालूच होते, पण हा प्रवाह क्षीण असला तरी मुख्य जोरकस प्रवाह राजकारणाचा आणि देशभक्तीचा होता. अशाही परिस्थितीत करमणूकची एक सवती दिंडी पूढे चालली होती, ललित लेखन आणि मनोरंजनातून ज्ञान वाटण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. संपादकाच्या प्रकृतीप्रमाणे करमणूक पत्रही सौम्य होते. केसरी परंपरेशी दूरान्वयानेही त्याचा संबंध नव्हता. हरिभाऊ राजकारण, नगरपालिका वा सार्वजनिक क्षेत्रांत वावरत असले तरी त्यांची वृत्ती राजकारण्याची नव्हती. मिल, स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरांचे त्यांनी स्वागत केले, तरी त्याचे करमणूक' वेगळेच होते. रंजक ललित लेखनातून सामाजिक सुधारणांवर भर देणे त्यांना इष्ट वाटे. त्यांची मते आगरकरांशी संवादी असल्याने नामदार गोखल्यांजवळ स्वतः अगरकरांनी आपली प्रकृती बिघडली असतांना, 'हरिभाऊ