पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
११
 

पुणे : २-९-१९१३

सा. न वि. वि.

 आपली 'चंद्रसेना' ही कविता व सोबतचे पत्र पावले. मला आपली कविता फार आवडली. भाषा सुबोध व भाव सहजगम्य आहे. ही ता. ६ सप्टेंबरच्या 'करमणूकीत ' प्रसिद्ध होईल. व अंकाची एक प्रत आपणाकडे पाठविण्यात येईल. ध्रुवपदांच्या नंतरच्या पहिल्याच कडव्यात-

 'जे तुला जिवाहूनि थोर । रमेहुनि प्यार ।'

 असे चरण आहेत यातील 'प्यार' शब्द मात्र मला बरा वाटला नाही. एकंदर भाषेशी विसंवादी वाटतो, कळावे लोभ असावा, ही विनंती.

आपला,
- ह. ना. आपटे
(विश्रब्ध शारदा पृष्ठ ३४४)

 हरिभाऊंचेे निकटवर्ती प्रा. वि. वा. अंबेकर यांनी हरिभाऊंच्या चरित्रपर लेखात म्हटल्याप्रमाणे '१८९४ नंतर हरिभाऊंच्या चरित्रातील संघर्ष संपून निर्भेळ विधायक कार्याला स्वतःला वाहून घेऊन आपल्या जीवनाचे एक निश्चित उद्दिष्ट शोधण्याची धडपड आहे. उत्तर आयुष्यात गवसलेले किंवा परिस्थिती आणि मनोवृत्ती यांनी नियमित केलेले उद्दिष्ट, विकसित करण्याची एक पद्धतशीर व सुरळीत उपक्रमशीलता आहे.'

(हरिभाऊ विविध दर्शन : पृष्ठ १८)

 याचा प्रत्यय 'करमणूक 'च्या संपादनात आणि उद्दिष्टात येतो.

 १८९९ मध्ये श्री. गोविंदराव डुकले यांनी करमणूक चालविण्यास घेतले होते. तर विठ्ठल जिवाजी नाडकर्णी यांचा लेखक व संपादकीय सहाय्यक म्हणून १८८१ ते अखेरपर्यंत 'करमणूक 'शी संबंध आला होता.

'करमणूक'चेे उद्दिष्ट-

 साप्ताहिक 'करमणूक'चे उद्दिष्ट त्याच्या नावातूनच पुरतेपणी स्पष्ट झालेले आहे. किंबहुना एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकांचेच एक वैशिष्ट्य आहे की त्यांची नावे अतिशय बोलकी व अर्थपूर्ण आहेत. त्यांच्या नावातच सारे सामावलेले आहे. 'ज्ञान' आहे, 'प्रकाश' आहे, 'प्रबोध' आहे, आणि 'मनोरंजनही' आहे. तसेच 'करमणूक' निव्वळ करमणुकीसाठी निघाले. 'मासल्याच्या अंकात करमणूक का निघणार ?' या सदराखाली उद्देशदर्शक मजकूर दिला होता. तो लोकाग्रहास्तव