पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्याकरिता सज्ज होती. ३०,००० लोकांच्या सात दिवसांच्या जेवणखाणासाठी लागणारा माल तेथील शीतगृहात कायमचा साठवलेला असतो. दर आठ दिवसांनी साठा बदलण्यात येतो. एका वेळी २० लोकांवर शस्त्रक्रिया करता येतील इतके मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे. त्याचा उपयोग करण्याची वेळ कधी येत नाही. तरीही यंत्रणेच्या सुसज्जतेत तसूमात्र ढिलाई होत नाही. माणसाच्या एवढ्या जय्यत तयारीपुढे निसर्गही मान तुकवतो. या उलट, आमच्याकडे आसमानी संकटाच्या एका फटक्यात हजारो माणसे गारद होतात, लक्षावधी जखमी होतात आणि कोट्यवधी निराधार होतात. सारांश, आपत्ती निसर्गाच्या अतिरेकाची नसते; ती असते माणसाच्या दुर्बलतेची.
 संकटी सदा बेसावध
 किल्लारी-सास्तूर भूकंपाला मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूमातेचा कोप म्हटले; पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी 'अस्मानी संकट' असा शब्द वापरला. त्यांच्या युक्तीवादाचा मतितार्थ, "आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना." हजारो लोक आपल्याच घराच्या भिंतींच्या, दगडमातीच्या ढिगाखाली चेंगरून मेले ही सगळी देवाजीची इच्छा! यात शासनाचा दोष काही नाही. आम्ही आता मदत म्हणून जे काही काम करण्यासारखे आहे ते करतोच आहोत. निवडणुकीच्यावेळी राग नसावा!
 बिहारमध्ये भूकंप झाला; हजारो माणसे मेली. गांधीजींनी म्हटले होते, "देशातल्या अस्पृश्यतेच्या चालीच्या पापाबद्दल मिळालेले हे प्रायश्चित्त आहे." पंतप्रधान लातूरच्या भेटीला आले, त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, "मग, किल्लारीच्या भूकंपाचे पाप कोणाचे?" पंतप्रधानांचे उत्तर, "याचा विचार ज्याने त्याने आपल्या मनात करावा." म्हणजे दस्तूरखुद्द पंतप्रधानांना आत्मनिरीक्षणाची गरज नाही.
 बळीराजाचाच बळी
 एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडला तर सारी दुनिया खुश होते; पण पाऊस पडला नाही तर त्यामुळे बिगर शेतकरी समाजाच्या आयुष्याला थोडासुद्धा धक्का लागत नाही. धान्याचा एक दाणाही न पिकवणाऱ्यांचा गुजारा व्यवस्थित होतो आणि धान्य पिकवणारे शेतकरी मात्र पोटाला भाकरी मिळावी म्हणून बेघर होऊन खडी फोडायच्या केंद्रावर हात फोडून घ्यायला जातात.

 दुष्काळाची कथा, तीच भूकंपाची. किल्लारी-सास्तूरच्या भूकंपात बळी कोण

भारतासाठी । ९१