पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कॅन्सरची बाधा फार जुनी आहे. तिच्याकडे दुर्लक्ष झाले, उपाययोजना झाली नाही. एवढेच नाही तर ज्या ज्या गोष्टींमुळे कॅन्सर बळावतो त्या सगळ्या गोष्टी रोगी फार काळ करत राहिला आहे. त्यामुळे कॅन्सरच्या गाठी शरीरात पसरल्या आहेत. देशाच्या पोषणाकरिता ज्यांची काहीही मदत नाही; उलट, पोषणाच्या कामात अडथळा आणणाऱ्या या गाठी वेगाने फोफावत आहेत. या गाठी नोकरदार कॅन्सरच्या आहेत. यात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे आहेत, गचाळ, अकार्यक्षम काम करणारे खाजगी उद्योगधंदेही आहेत. देशाच्या शरीरावर ताव मारून या सगळ्या भयानक गाठी पोसल्या गेल्या आहेत, आणखी फोफावत आहेत.
 प्रतिकार सोडाच, स्वागतच
 माणसाच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठींपेक्षा देशाच्या कॅन्सरच्या गाठी अधिक भयानक आहेत. शरीरातील निरोगी पेशींना कॅन्सर आपला शतू आहे हे समजते; पण त्यांचा काही इलाज चालत नाही. देश-शरीरातील कॅन्सरच्या गाठींनी सगळ्या शरीरातील पेशींची खात्री पटवून दिली आहे की त्या गाठी म्हणजेच देश आहे. देशाचे भले त्यांनाच समजते. कॅन्सरची जितकी वाढ होईल तितके त्या शरीराचे भले होईल अशी देशाच्या घटकांची खात्री पटली आहे. गाठी पसरत आणि बळावत आहेत आणि शरीरातील निरोगी पेशी त्यांची वाहवा करत आहेत, टाळ्या पिटून आनंदोत्सव करीत आहेत.
 एडस् ची बाधा

 एडस् च्या रोग्याच्या शरीराप्रमाणेच देशाचीही स्थिती झाली आहे. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती तर सोडाच, इच्छाही राहिली नाही. सातबाराच्या उताऱ्यासाठी गेलेला शेतकरी तलाठी सांगेल ती रक्कम निमूटपणे त्याच्यासमोर ठेवतो. गावचा पाटील तालेवार माणूस, पण गावांत आलेल्या पोलिस शिपुर्ड्याचीसुद्धा कोंबडी, बाटली आणि दक्षिणा ठेवून आळवणी करतो. दुकानदार, व्यापारी मंडळी घिरट्या घालणाऱ्या इन्स्पेक्टरच्या झुंडींना बिनतक्रार हप्ता देतात. आसपासचे गुंडागर्दी करणारेसुद्धा बिनदिक्कत येतात, हप्ते मागून घेऊन जातात. कारखानदार म्हणजे बडी प्रस्थे, पण अधिकारी आणि पुढारी दोघेही त्यांच्याकडून सुटकेसा भरभरून वसुली करून जातात. ही सगळी लूट आपण देशाच्या भल्याकरिता करीत आहोत, आपण म्हणजेच देश, 'कॅन्सर' म्हणजेच शरीर असे म्हणत लूट करतात आणि त्याबद्दल कुणीही रागवत नाही, चिडत नाही. लाच मागणाऱ्याला पोलिसात नेण्याचा प्रश्नच नाही. एका कॅन्सरच्या गाठीविरुद्ध दुसऱ्या गाठीकडे तक्रार गुदरण्यात काय अर्थ आहे? असे स्वतःचे समाधान करून आपल्या

भारतासाठी । ८७