पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अतिदक्षता विभाग-रोगी भारत


 संकटांची धाड येते
 "तारुण्य, वैभव, सत्ता आणि सौंदर्य या चार गोष्टींपैकी एक गोष्ट लाभली तरी त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. चारही जिथे एकत्र येतील तेथे काय अनर्थ घडेल?" असे जुने संस्कृत सुभाषित आहे.
 चार चांगले दुर्गुण एकत्र आले तरी विनाश ओढवतो, मग चार दुर्गुण एकत्र आहे तर? आधीच माकड, त्यात दारू प्याला, त्या अवस्थेत त्याला विंचू चावला आणि सर्वात कडी म्हणजे त्याला भूत लागले तर त्या माकडाची स्थिती काय वर्णावी? असा विनोदी श्लोकही आहे.
 एक एक व्याधी मृत्यू ओढवण्याला पुरेशी असते. दोनचार रोगांनी मिळून हल्ला केला तर निष्णात वैद्यांनाही हात टेकावे लागतात. त्यात, ओढवलेला प्रत्येक आजार असाध्य असेल तर? एके काळी असाध्य समजले जाणारे हिवताप, देवी, विषमज्वर, प्लेग यांसारख्या रोगांवर वैद्यकशास्त्राने मात केली आहे; पण आजही कॅन्सर आणि एडस् हे दोन असाध्य रोग मानले जातात. त्यावर औषधोपचाराची नक्की उपाय योजना सापडलेली नाही.
 कॅन्सर आणि एडस्
 कोणा एकाला कॅन्सर झाला म्हटले की त्याला इस्पितळात नेऊन दाखल करायचे, केल्याशिवाय राहवत नाही म्हणून औषधोपचार करायचा, पण मनामध्ये ही निश्चिती की आपले माणूस पुन्हा ठीकठाक होऊन हिंडू फिरू लागेल हे अशक्य आहे.

 एडस् या रोगाची त्याहून भयानक अवस्था. या रोगाचा संसर्ग झाला की माणसाचा मृत्यू अटळ. या रोगामुळे माणूस मरत नाही, पण रोग्याला साध्या सर्दीपडशाची बाधा झाली तर त्या जंतूंनासुद्धा तोंड देऊन प्रतिकार करण्याची

भारतासाठी। ८५