पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्गांनी त्यांनी शेतकऱ्यांची पोरे देशोधडीला लावली.

 आज नेहरूवादी नियोजनाचा सर्वतोपरी पराभव झाला आहे असे मनोमन सर्वांना पटले आहे, पण कोणी तसे मोठ्याने बोलत नाहीत; तसे खुलेआम बोलले तर मोठा गहजब होईल. नेहरू-अर्थकारणातील विकृती 'इंडिया'पुरती दूर करायची आहे, 'भारता'त नेहरूवादाचा नंगानाच चालू राहिलाच पाहिजे असा 'इंडिया'वाल्यांचा आणि सत्ताधाऱ्यांचा हितसंबंध गुंतलेला आहे.

 खुल्या बाजारपेठेचा उदोउदो भले चालू असो, शेतीच्या क्षेत्रात मात्र अजून नेहरू व्यवस्थाच थैमान घालत आहे. देशात परकीय चलनाचा मोठा तुटवडा आहे, पण कापूस निर्यातीस बंदी आहे, कांदा निर्यातीवर बंधने आहेत. देश परकीयांच्या कर्जात बुडतो आहे तरी परदेशात साडेचारशे ते सहाशे रुपये प्रती क्विटल भावाने गहू आणून तो देशातील बाजारात सव्वातीनशे रुपयांनी ओतण्याचे धोरण नव्या पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. नेहरूवादाच्या या भुताने शेतकऱ्यांची आहे त्याहूनही धुळधाण होणार आहे; पण शेतकरी बिचारा सज्जन आहे. तो चिडत नाही. तो रागावत नाही. त्याला संताप येत नाही. पोरेबाळे उपाशी राहिली तरी तो शांत राहतो. बायकापोरे दुष्काळी कामावर खडी फोडायला जातात याचेही त्याला दुःख नाही. त्याला जोपर्यंत संताप येत नाही तोपर्यंत नेहरूंचे पुतळे पांढरी शुभ्र अचकन, राजबिंडे हास्य व छातीवरील गुलाब यांच्यासकट शेतकऱ्यांच्या छातीवर पाय देऊन उभे राहणारच आहेत.

(२१ जून १९९२)

♦♦

भारतासाठी । ३९