पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/262

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याची खात्री असताना नेटाने निघतात याला हिंदुवीरांकडे जवाब नाही.
 हिंदू तरुणांनीही घातपाती कृत्यासाठी सज्ज व्हावे असा आदेश हिंदुहृदयसम्राटांनी दिला पण एकही जौहरी हिंदू आतंकवादी तयार झालेला दिसत नाही. एक लाखानी निघाला पण त्याचा कार्यक्रम ध्येयापोटी नाही, केवळ धनाशेपोटी. त्याने रॉकेट पुरवण्याचा कारभार केला तो पाकिस्तानी घातपात्यांना उत्तर देण्याकरिता नाही, तर अमेरिकेतील इस्लामी गटांना शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी.

 अर्थवादी आक्रमक बनत नाही

 शेतकरी संघटनेची लढाई अर्थवादी चळवळ आहे. त्यात स्वतःच्या फायद्याकरिता दुसऱ्याचे कोणाचे काहीही हिरावून घेण्याची हिणकसता नाही. 'घामाचे दाम तेवढे घेऊ, तो आमचा श्रमसिद्ध अधिकार आहे' या विचाराने मनात तामसी द्वेष उद्भवत नाहीत. त्यासाठी कोणाचा जीव घ्यावा अशी भावना तयार होत नाही. शेतकरी संघटनेचे तरुण कार्यकर्ते अलिकडे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे वर्णन करताना, 'तुमच्या आईबापांना यांनी असे घोळले' अशी भाषा वापरून काही त्वेष तयार करण्याचा प्रयत्न करतात. यातून निघणारे पराक्रम आणि पौरुष किरकोळ झेपेचे आणि फारच तात्कालिक असते. 'शेतकरी तितका एकएक' ही घोषणा अगदी जुनी आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षाचे स्वरूप भटशाहीविरुद्ध आहे असे महात्मा जोतिबा फुल्यांनी मांडले. चालू कालखंडात लढाई 'इंडिया' विरुद्ध आहे असे तर्कशुद्ध युक्तिवादाने सांगितले गेले पण त्यातून तेजस्वी कार्यक्रम उभा राहिला नाही.

 कारखानदारी कामगारांच्या, शेतमजुरांच्या किंवा आदिवासींच्या व दलितांच्या चळवळी, शेतकरी आंदोलनाच्या तुलनेने पाहिले तर, संख्याबळाने किरकोळ पण या आंदोलनांची शाहीरी ताकद अधिक, शहरी पांढरपेशांत त्यांच्याविषयी सहानुभूती आणि संवेदना अधिक. या आंदोलनात घातपाती किंवा आक्रमक कार्यक्रम होऊ शकतात. बाबासाहेब आंबेडकरांना दलितसमाजाने दैवी अवताराचे स्थान दिल्यामुळे निदान बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवला तर दलित घातपाती कृत्यांनाही तयार होतात.

 शोषितांच्या चळवळीत सर्वसाधारणपणे जितकी आक्रमकता आहे तितकीही शेतकरी चळवळीत दिसून येत नाही. लोकसभेत, विधानसभेत शेतकऱ्यांची मुले बहुसंख्य आहेत, तरीही शेतकरी आंदोलक हिम्मत बांधत नाही आणि सरकार शेतकरी आंदोलकांना निघृण पद्धतीने दडपून टाकते, त्याविरुद्ध फारसा आवाजही खासदार आमदार मंडळी उठवत नाहीत.

भारतासाठी । २६२