पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/260

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाखवला असता ते सांगता येत नाही.' शेतकरी संघटना तिच्या प्रभावाच्या जोरात होती त्यावेळी शिवसेना ही नगण्य ताकद होती; भारतीय जनता पार्टी तर जवळजवळ समूळ संपली होती. शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे यांनी शहरी गुंडांच्या टोळ्या, त्यांचे मार्ग, त्यांची साधने यांचा अनमान केला नाही; दगडफेक, मोडतोड, प्रसंगी रक्तपात यांच्या आधारे शिवसेनेविषयी लोकांच्या मनात त्यांच्या सैनिकांनी दहशत तयार केली त्याचे कौतुक केले. हिंगणघाटच्या शिवसेनेच्या आमदारकीच्या उमेदवाराने त्यांच्या शेजाऱ्याची बायको पळवली - प्रेमापोटी नाही, बाजारात विकण्यासाठी - तरी हिंदू हृदयसम्राटाने हिंदू संघटनांना अशा वीरांची गरज आहे अशी उघड शाबासकी दिली असे म्हणतात. यामुळे विचारशून्य हिंदुत्वाची लाट देशभर आली. याउलट, तर्कशुद्ध विचारसंपन्न शेतकरी संघटनामात्र पक्षाघात झाल्याप्रमाणे आंदोलनाच्या क्षेत्रात आणि निवडणुकीच्या तंत्रातही प्रभाव पाडू शकली नाही.

 माणसांचे दोन प्रकार

 दोस्तोवस्की या रशियन लेखकाने ठीळाश । झींळिीहार्शी या त्याच्या जगविख्यात कादंबरीत म्हटले आहे, "माणसामाणसांत दोनच प्रकार असतात. ज्यांनी कधी कोणा दुसऱ्या माणसाचा प्राण घेतला आहे ते एका बाजूला आणि हत्या केल्याचा अनुभव नसलेले दुसऱ्या बाजूला." हातून एक हत्या घडली की माणसाची सर्व मानसिकताच बदलते. आपण कोण? माणूस म्हणजे काय? हे जग काय आहे? चांगले म्हणजे काय? वाईट म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींबाबत सारी धारणाच एकदम बदलून जाते. 'सत्यं शिवं सुंदरम्' नैतिकता सगळ्या उलट्यापालट्या होऊन जातात. एक खुनी आणि दुसरा कोणाची हत्या न केलेला अशा दोन माणसांत साधे संभाषणही होऊ शकत नाही. दोघेही बोलतात व्यवहारातलीच वाक्ये, शब्दकोशातलेच शब्द - परिचयाचे; पण, हत्यारा दुसऱ्या माणसाशी बोलताना हा आपल्यासारखाच माणूस आहे अशी भावना मनात आणूच शकत नाही. कसाई बकरीकडे जसा पाहतो तसाच काहीसा हत्यारा सर्वसामान्य लोकांकडे पाहतो. 'माहीत आहे वटवट करतो, एक वाताडा घातला तर उताणा पडेल', अशी एक वाचा न फुटलेली भावना हत्याऱ्याच्या मनात कायम असते.

 साऱ्या जगात सध्या आतंकवाद्यांचे थैमान चालू आहे. जवळजवळ दररोज कोठे ना कोठे जीवावर उदार झालेले आतंकवादी हल्ले चढवतात, अनेकांना मारतात, स्वतःही मरण पत्करतात. ११ सप्टेंबर २००१ च्या न्यूयॉर्कमधील विश्व व्यापार केंद्राच्या दोन मनोऱ्यांवर दोन विमाने आतंकवाद्यांनी आदळवली

भारतासाठी । २६०