पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे.

 थोड्याच वर्षात एक नवे आधुनिक सौराष्ट्र आणि कच्छ उभे राहणार आहे. देशातील सर्व राज्यांना गिरवण्याचा कित्ता वाटावा असा नवा सौराष्ट्र, कच्छ उदयास येणार आहे.  एका काळी लंडन शहर गल्ल्याबोळ आणि जुनाट इमारतींनी गजबजले होते. रोगराई वाढत होत्या. इतिहासप्रसिद्ध अग्निप्रलयाने लंडन जळून खाक झाले आणि त्या राखेतून आजच्या वास्तुशास्त्रात आदर्श मानल्या जाणाऱ्या लंडनचा उदय झाला.

 सारा गुजरातही अशी झेप घेण्याची कुवत राखून आहे. कदाचित काही वर्षांत भूकंप ही इष्टापत्ती वाटू लागेल आणि भूकंपापूर्वी सारे कसे गचाळ होते आणि आता नवे कसे सुंदर उभे राहिले आहे अशी भाषा सुरू होईल. गुजराती समाजाच्या कर्तबगारीवर पुनर्बाधणीचा प्रश्न सोपवण्यात आला तर काम झपाट्याने होईल, चांगले होईल; देशावर बोजा न पडता होईल. अर्थव्यवस्थेची भरभराटही साधेल. याउलट, प्रशासनाने सारे आपल्या हाती घ्यायचे म्हटले तर अर्थव्यवस्था कमजोर होईल, पुनर्बाधणीचे कामही होणार नाही.

 फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून उड्डाण करण्याचे सामर्थ्य गुजरातमध्ये आहे. शासनाने दुराग्रह केला नाही तर गुजरात यापुढे दगडामातीच्या ढिगाऱ्यातून उठून नवे उड्डाण घेऊ शकतो. सरकारने मोकळीक दिली तर!

(६ फेब्रुवारी २००१)

◆◆

भारतासाठी । २३०