पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पहिली लढाई
 इंग्रज आल्यावर वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. पहिली प्रतिक्रिया जुन्या सत्ताधारी समाजाची. इंग्रज आले हे फार वाईट झालं देशाला पारतत्र्य आलं, देशावर परकीयांचं राजय आलं, आमच्या हातातली सत्ता गेली; पण कंपनी सरकारला कितीही नावं ठेवली तरी १८५७च्या बंडाच्या आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून हिंदुस्थानातील असवर्ण जाती आणि स्त्रिया यांची दयनीय स्थिती पाहून त्यांच्याकरिता शिक्षण, आरोग्य यासंबंधी व्यवस्था व्हावी, सतिबंदी अशा प्राथमिक सुधारणा करण्यास सुरुवात केली. याला इतिहास साक्षी आहे; पण, ज्या मंडळींच्या हातून सत्ता गेली त्यांना त्याचं दुःख होतं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर, पुण्यातली पेशवाई बुडली म्हणून ब्राह्मणांना मोठं दुःख होतं आणि सबंध हिंदुस्थानातलं आपलं राज्य गेलं म्हणून मुसलमानांना मोठं दुःख होतं. या दोन राज्यकर्त्यांना मोठा खेद वाटे की इंग्रज आले आणि त्यांनी आपली सत्ता काढून घेतली, एवढंच नव्हे तर आपल्या 'खालच्या' लोकांना आपल्या बरोबरीला आणण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. तेव्हा हिंदुत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना जागी करून हिंदुस्थानातून इंग्रजांना तातडीने हाकून लावलं पाहिजे असं म्हणणारांचा पहिला राष्ट्रीय गट या जुन्या सत्ताधाऱ्यांतून तयार झाला.

 आपल्या लक्षात येईल की, इंग्रज आल्यामुळे शेती बुडाली, बलुतेदारी बुडाली, जे काही शोषण झालं ते जास्तीत जास्त ग्रामीण भागातील समाजाचं झालं कारण कच्च्या मालाच्या शोषणाकरिताच इंग्रज इथे आले होते; पण इंग्रज राज्याविरुद्ध हातामध्ये बंदुका घेऊन कोण उठलं हे जर आपण पाहिलं तर त्यात सगळी नावं वासुदेव बळवंत फडके, चाफेकर अशी - म्हणजे जुन्या काळी ज्यांच्या हाती सत्ता होती आणि इंग्रजांमुळे आपली सत्ता गेल्याचं दुःख होतं त्याच मंडळींची नावे पुढे येतात. तीच मंडळी 'पहिल्यांदा इंग्रजांना काढून लावा आणि स्वातंत्र्य मिळवा' असं म्हणू लागली. उदाहरणादाखल, संमतीवयाचा कायदा घ्या. पहिल्यांदा जेवहा बिल आलं तेव्हा त्यात म्हटलं होतं की, मुलीचं लग्न बयाच्या दहाबारा वर्षाआधी करू नये, प्रस्ताव इंग्रजांचा होता आगरकरांसारख्या समाजसुधारकांचा त्याला पाठिंबा होता. त्यात वाईट वाटायचं काय कारण होतं? मात्र, 'राष्ट्रीय पक्षाच्या लोकमान्य टिळकांनी त्यावर टीकाटिप्पणी केली की, "हे बिल काही वाईट नाही; पण मावशी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. इंग्रजांना आमच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ

भारतासाठी । २१३