पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/211

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकरू लागले. याचा अर्थ असा की, ज्यांना खुलपण सोयीस्कर वाटतो ते खुलेपणाचा पुरस्कार करतात. ज्यांना खुलेपण आणि स्पर्धा गैरसोयीची वाटते ते विरोध करतात.
 हे साहजिकच आहे. माणसं काही तत्त्वांनी चालत नाहीत. 'स्वातंत्र्य' या कल्पनेला माझी निष्ठा वाहिलेली आहे. म्हणून, मी जरी भुकेने मेलो तरी चालेल; पण खुल्या व्यवस्थेला पाठिंबा देईन. असं म्हणणारा माझ्यासारखा पागल एखादाच असतो. बहुतेक माणसं विचार असा करतात की, “या खुलेपणातून आपल्याला काही मिळणार आहे का, कामगाराचं काही भलं होणार आहे का? शेतकऱ्याला काही फायदा मिळणार आहे का, कामगाराचं काही भलं होणार आहे का? देशाला काही फायदा होणार आहे का?" जो तो असा विचार करतो आणि जिथं ज्याचा फायदा असेल त्याप्रमाणे तो आपापली भूमिका घेतो.
 हे त्यावेळी खरं होतं, आजही खरं आहे, जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO)च्या किंवा इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या ज्या काही बैठका भरतात त्या बैठकांमध्ये वेगवेगळ्या राष्टांचे मान्यवर प्रतिनिधी भाषण करायला उठन उभे राहिले की, पटकन समजतं की, "हा असं का बोलतो?" कारण, त्यात त्याच्या देशाचं हित आहे.
 हिंदुस्थानसारख्या देशांमध्ये एक वेगळी परिस्थिती तयार होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्याचे फायदे थोड्यावर फरकाने सर्वदूर समाजाच्या सर्व थरांपर्यंत पसरले. याउलट, फ्रान्समध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली नव्हती तेव्हा पॅरिस शहर सोडलं तर सर्वत्र मागासलेपण होतं. हिंदुस्थान हा एक विशेष देश आहे. येथे खुली व्यवस्था म्हटली तर एका गटाा फायदा होतो आणि बंदिस्त किंवा स्वदेशी व्यवस्था म्हटली तर दुसऱ्या गटाचा फायदा होतो. दोन गट वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यातील वाद हे फार जुन्या काळापासून चालू आहेत.

 स्वदेशीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लढाईच्या विश्लेषणाआधी, त्यासारखी एक लहानशी चकमक झाली होती. त्याची आधी आठवण करून देतो. इथं इंग्रज असतानासुद्धा रुपयाचा विनिमय दर एक शिलिंग चार पेन्स असावा का एक शिलिंग सहा पेन्स असावा याबद्दल मोठा वाद चालत असे. त्याहीवेळी कारखानदार मंडळी रुपया जास्त महाग असावा म्हणजे परदेशातून यंत्रसामुग्री आणायला त्यातल्या त्यात स्वस्त पडेल असं मांडत असत. याउलट मांडणी कापसाची निर्यात करणारे शेतकरी विदर्भाले, हरियाणा पंजाबमधले

भारतासाठी । २११