पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडताहेत आणि अशा हक्काची पायमल्ली करणाऱ्या यंत्रणेतील नोकरीमध्ये आम्हाला हक्क मिळाला पाहिजे, त्या नोकऱ्यांमध्ये राखीव जागा मिळाल्या पाहिजेत किंवा दुसऱ्या कुणाला मिळता कामा नयेत असं म्हणणाऱ्यांची आंदोलनं प्रखर होताहेत; गाड्या जळताहेत, रस्ते बंद पडताहेत, राजधानी बंद पडते आहे. एकूणच परिस्थिती निराशा तयार करणारी आहे. एका अर्थाने, हा आर्थिक विचार मांडणाऱ्या सर्वांचा पराभव आहे.

(६-२१ सप्टेंबर १९९०)

♦♦

भारतासाठी । २१