पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/207

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वदेशीची तिसरी लढाई


 प्रास्ताविक
 'स्वदेशीची तिसरी लढाई' असा आजचा विषय आहे. 'लढाई' हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे. 'स्वदेशी' या विषयावर बोलताना दोन्ही पक्षाची माणसं अटीतटीवर येऊन तंडतात. आपल्याशी ज्याचं एकमत होत नसेल तो मनुष्य एकतर देशद्रोही आहे किंवा आणखी काही आहे असं समजून मोठी कठोर भाषा वापरतात, शिवीगाळ करतात. आपल्या मताशी याचं जुळत नाही म्हणजे हा धर्मवादी असेल, राष्ट्रवादी असेल, डाव्या विचाराचा असेल असे अरोप होतात किंवा दुसऱ्या बाजूने हा 'मल्टिनॅशनल्स्चा भाडोत्री कुत्रा' अशा डाव्या लोकांच्या जुन्या परंपरेतल्या शिव्या पारल्या जातात. फार कडक तहेने एकमेकांवर आरापप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. खरोखरची जीवघेणी, हमरीतुमरीची लढाईच चाचली आहे. देश धोक्यात आहे. फंद फितुरी माजली आहे; पण या लढाईत एक मोठी गमतीची गोष्ट होऊन राहिली आहे.

 “स्वदेशी' म्हणजे लोकांनी परदेशी वस्तूंचा उपयोग आपणहून टाळणे. जी माणसं आज स्वदेशाचा आग्रह धरतात त्यांच्या दृष्टीने स्वदेशीचा अर्थ वेगळा असतो; एवढा मर्यादित नसतो. गाधीजींच्या वेळी स्वदेशी वस्तू वापराव्या, खादी वारावी, स्वदेशी वस्तू वापरावी. वर्तमानकाळातील 'स्वदेशी'ची व्याख्या अशी नाही. गांधींच्याही आधी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी लोकांनी विलायती कापडाच्या होळ्या केल्या, स्वत:च्या अंगावरचे कपडे काढून होळ्यांत टाकले. आधुनिक स्वदेशीवाल्यांचा स्वदेशीचा अर्थ सावरकर-टिळकांसारखाही नाही. सरकारने परदेशातून येणारा माल कायद्याने थांबवावा किंवा त्यावर आयात कर लादावे, बंदी घालावी असा कायद्याच्या आधाराने लोकांवर स्वदेशी थोपण्याचा हा आजचा विचार आहे. त्याला मी

भारतासाठी । २०७