पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/201

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेनसता. ज्याला बाहेर जायचे असेल त्याला दार उघडे आहे अशी स्पष्ट भूमिका असली की, बाहेर जाण्याची खळखळ फारशी कोणी करीत नाही. दरवाजा बंद आहे असे दिसले की, बंदीच्या मुठी दरवाजावर आदळू लागतात.
 समजा, सार्वमताचा निर्णय आपल्या विरुद्ध गेला असता, काश्मिर वेगळे झाले असते किंवा पाकिस्तानात गेले असते; काय झाले असते? असल्या समस्यांचा बोजा राहिला नसता तर जागतिक राजकारणात हिंदुस्थानची प्रतिमा उज्ज्वल तर झाली असतीच; पण त्यापलीकडे आपण संपन्नतेच्या दिशेने झपाट्याने आगेकूच करीत राहिलो असतो. महायुद्धात उद्ध्वस्त झालेला पश्चिम जर्मनी तीन दशकांत वैभवाच्या शिखराला पोहोचला. तेथील राहणीमान, रोजगाराच्या संधी आणि स्वातंत्र्याच्या कक्षा लक्षात आल्यावर पूर्व जर्मनीच्या नागरिकांच्या मनातील विभक्त राहण्याचा हट्ट वितळून गेला. सारा राग, द्वेष सोडून पूर्व जर्मनी पश्चिमेतील भावांबरोबर नांदायला तयार झाला.
 संपन्न घरातून वेगळे कोणीच पडू इच्छित नाही. हिंदुस्थानात देशापासून किंवा राज्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र चूल घालण्याचा खटाटोप चळवळी, आंदोलनाने सर्व दूर होत आहेत. अमेरिकेत अशी एकही चळवळ नाही. उलट, अमेरिकेतील नवे राष्ट्रे आनंदाने तयार होती. दरिद्री भारतात भावंडांना मारूनमुटकून बळजबरीने कोंडून घरात ठेवण्याऐवजी त्यांना मोकळे केले असते, गृहकलह संपविला असता आणि उरलेला हिंदुस्थान बलसागर झाला असता तर, फुटून गेलेले भाऊसुद्धा पुन्हा एकदा हिंदुस्थानात सामील होण्याकरिता आनंदाने तयार झाले असते.

 ही समजसपणाची बुद्धी श्रीमंतांना सुचते, गरीबांना क्वचित! हा काय प्रकार आहे? हे असे का होते? याचे एक कारण सहज समजण्यासारखे आहे. विकसित देशांत माणसांचे, समाजाचे आणि राष्ट्राचे हिशेब शुद्ध आकड्यांचे असतात. अधिकाधिक सुखाने जगावे, अनुभवाचे विश्व व्यापक करावे असा त्यांचा शुद्ध स्वार्थी विचार असतो. व्यापारी मंडळी देवघेव करायला तयार असतात; एखाद्या व्यवहारात घाटा आला तरी चालेल, पुढे कसर भरून काढू असा विचार करतात. कारकून असलो म्हणून काय झाले. साहेबाला फाडकन सांगितले आणि राजीनामा टाकून मोकळा झालो. असली बाणेदार तडफ हिशोबी माणसे दाखवीत नाहीत. आपला स्वार्थ साधायचा तर त्यात इतरांच्याही स्वार्थाची सोय झाली पाहिजे याची व्यवहारी जाणीव त्यांना असते, आपला फायदातोटा, इतरांचा कायदातोटा याचे, पैशाच्या रूपात का होईना, मोजमाप कराण्याची

भारतासाठी । २०१