पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकारण्याकरिता आवश्ये ती दूरदृष्टी दाखवतात. समझोत्यामुळे समाधान कोणाचेच होत नसते. दोन्ही पक्षांतील असमाधानाची पातळी जवळपास सारखी करणे एवढाच समझोत्याचा उद्देश असतो. ते असमाधान स्वीकारण्यात काही मुत्सद्दीपणा असतो आणि पुष्कळसा व्यवहारी हिशेबही असतो. जुन्या वादांवर अभिमानापोटी झुंजत राहिल्याने नवी प्रगती खुंटते. प्रतिस्पर्ध्याकडून अधिक हिस्सा वळकावण्यापेक्षा तोच वेह आणि ताकद वापरून दुसऱ्या क्षेत्रात अधिक लाभ पदरी पाडून घेता येईल. अशा हिशोबाने जुन्या वादावर पांघरूण घालण्याची तयारी अशा देशातील नागरिक आणि नेते दाखवितात.
 गरीब देशातील लोक असा समजूतदारपणा म्हणा, मुत्सद्दीपणा म्हणा का हिशोबीपणा म्हणा क्वचितच दाखवितात. भावाभावांची जमिनीवरून वादंगे होतात, प्रकरणे कोर्टात जातात, वर्षांनुवर्षे तारखा पडत राहतात, वकीलांच्या तिजोऱ्या भरत जातात आणि मूळचे मालदार भाऊ खचत खचत जातात. तरीही, "आपला भाऊच आहे, घेऊ दे त्याला थोडे जास्त." फसा समजूतदारपणा, दिलदारपणा, उदारपणा फारसे कोणी दाखवत नाही. आपण भांडण मिटवले आणि भावाचे मन जिंकून घेतलं तर दोघांच्या एकोप्याने गावात, तालुक्यात दोघांचाही दबदबा वाढेल असा दूरदर्शी मुत्सद्दीपणा त्याहूनही दुर्मिळ भाची खोडकी जिरविण्यासाठी पैसे, बुद्धी, ताकद घालविण्यापेक्षा दुसरा काही उद्यागधंदा सुरू केला तर वादातील मालमत्तेपेक्षा कित्येकपट अधिक मोठे घबाड पदरात पडून घेता येईल असा शुद्ध स्वार्थी हिशेबीपणासुद्धा क्वचितच सुचतो.

 जशा व्यक्ती तसेच राष्ट्र. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत देशाची प्रगती झाली नाही. साधनसंपत्ती भरपूर असलेला हा देश अजूनही जगातील भिकारी देशांच्या पंगतीतच आहे; याची कारणे अनेक आहेत; पण काश्मिर, पंजाब, ईशान्य प्रदेश येथील फुटीवर चळवळीचा पाडाव करण्यात अपरंपार शक्तिपात झाला आणि त्यामुळे विकासाची गती खुंटली हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. देश म्हणजे कोणी आपली आई आहे आणि भूप्रदेशाचा एवढासा तुकडा काढून देणे आहे अशा काही प्रतिमा इतक्या रुजल्या आहेत की, "देशाच्या रक्षणात आम्ही प्रयत्नांची प्रत्येक भाषणात म्हणताना चौऱ्याहत्तर वर्षांच्या अटलविहारी वाजपेयींचा गळा भरून येत आहे आणि डोळ्यांतून स्फुल्लिंग बाहेर पडत आहेत. असा भास होतो आणि श्रोत्यांच्याही मनात राष्ट्रभक्तीची एक प्रचंड लाट उसळून जाते, "देशाकरिता मरण्यासाठी कोण तयार आहे त्याने पुढे यावे." असे आवाहन केले तर लक्षावधी लोक त्याक्षणी तरी सहर्ष पुढे येतील. अशी ही राष्ट्रभक्तीची

भारतासाठी । १९९