पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोडल्यास पाकिस्तानने कोणत्याच संस्थानी प्रदेशावर हक्क सांगणे गैर आहे अशी हिंदुस्थानी लोकांची ठाम समजूत आहे. जुनागढ संस्थान बहुसंख्य हिंदु प्रजेचे संस्थानिक मुलसमान नवाब. भारताच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार संस्थान हिंदुस्थानात विलीन करावयाचे का पाकिस्तानात हे ठरविण्याचा अधिकार व्यक्तिशः संस्थानिकांकडे सोपविण्यात आला होता. जुनागढच्या नवाबाने पाकिस्तानात सामील व्हायचं ठरविले. संविधानाच्या दृष्टीने तसे करण्याचा त्याला हक्क होता; पण बहुसंख्य हिंदु प्रजेला पाकिस्तानात घालण्याचा या नवाबाला काय अधिकार असे. साहजिकच, हिंदुस्थानात मत. लष्कराच्या मदतीने जुनागढ संस्थान ताब्यात घेण्यात आले; हिंदुस्थानात सर्वत्र 'आनंदी आनंद जाहला.'
 दक्षिणेतील हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान. बहुसंख्य प्रजा हिंदु, आधिपत्य मुसलमान निजामाचे. येथेही वाद जुनागढसारखाच. जुनागढ निदान एका कोपऱ्यात समुद्रतटाकी बसलेले. हैदराबाद उपखंडाच्या मध्यभागी - ते पाकिस्तानात जाणे म्हणजे हिंदुस्नानी भूप्रदेशाला मध्यभागीच भगदाड पडण्यासारखे पोटात असा कॅन्सरचा गोळा राहिला तर हिंदुस्थान जगूच शकत नाही हे स्पष्ट होते. लष्कर पाठवून निजामाचे सारे संस्थान हिंदुस्थानने ताब्यात घेतले.
 जम्मू आणि काश्मिरची परिस्थिती नेमकी याउलट, राजा हिंदु, प्रजा बहुसंख्येने मुसलमान; पण काश्मिरची स्वत:ची अशी प्राचीन संस्कृती आहे. ती अर्वाचीन हिंदुस्थानच्या कडव्या मुसलमानी समाजधारणेशी तर नाहीच नाही. काश्मिरचा राजा निर्णय करण्यास असमर्थ ठरला. पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या नवाखाली लष्कर पाठवून आक्रमण केले. काश्मिरी प्रजा आणि हिंदुस्थानी लष्कर त्याला परतवून लावले; निम्मा प्रदेश मोकळा झाला. निम्मा पाकिस्तानच्या अंमलाखाली राहिला. शस्त्रसंधीची रेषा आखली गेली, ती रेषा ओलांडून पाकिस्तानव्याप्त प्रदेश मुक्त करणे हिंदुस्थानी लष्कराला झेपणारे नाही म्हणून ते शस्त्रसंधी रेषेवर पहारा देत बसले आहेत. शेख अब्दुलांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काळात असलेली निर्धामिक राष्ट्रभावना संपुष्टात आली. हिंदुस्थानी प्रशासक, लष्कर आणि कामिश्मिरी नेते यांच्या भ्रष्टाचाराला काश्मिरी वैतागले. हिंदुस्थानच्या तावडीतून सुटण्याकरिता मदत करण्यासारखा शेजारी देश म्हणजे पाकिस्तानच. स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाच्या उद्घोषाखाली पाकिस्तानने प्रशिक्षित आतंकवादी काश्मिरात पाठवून घातपात घडवून आणण्याचा तडाखा लावला आहे.

 पंजाबातील आतंकवाद संपुष्टात आणणे हिंदुस्थानी सुरक्षा दलांना मोठ्या

भारतासाठी । १९६