पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत. हिंदुस्थानचे म्हणणे इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश स्वातंत्र्यानंतर हस्तांतरणाने आमच्याकडे आला आहे; चीनचे म्हणणे - इंग्रजांच्या साम्राज्यवादी आक्रमणामुळे त्यांनी अनेकाचे प्रदेश बळकावले, त्याचा फायदा घेण्याचा हिंदुस्थानने प्रयत्न करू नये. त्यावर प्रतिवाद असा की, मुळात तिवेट हाच चीनचा भाग आहे का नाही? चीनमधील तिबेटच्या प्रदेशाच्या धार्मिक सत्ताधाऱ्याशी इंग्रजांनी करारमदार केले होते. पार राजधानी ल्हासापर्यंत भारतीय टपालसेवा चालत असे. मग, चीन त्या आधीचा इतिहास सांगू लागला. सारा चीन कम्युनिस्टांनी मुक्त केला त्याबरोबर धर्मवाद्यांच्या आधिपत्याखाली गुलामीचे जीवन जगणाऱ्या तिबेटी लोकांनाही त्यांनी मुक्त केले. हिंदुस्थानने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा सोडविले. त्यासारखाच हा इतिहास. थोडक्यात, युक्तिवादाने हा प्रश्न सुटण्यासारखा नाही, सीमाप्रश्न उभा राहिला, इंच इंच जमीन लढविण्याच्या भाषा सुरू झाल्या, एक तसूभर जमीन गेली तरी भारतमातेची विटंबना होईल अशा काव्यपंक्ती लोकांच्या लोकांच्या तोंडी आल्या; युद्ध झाले, हिंदुस्थानच्या लष्कराला माघार घ्यावी लागली, मग चिनी सैन्य मागे परतले. आजही जगातील सर्वात उंच, दुर्गम अशा प्रदेशात मरणाच्या थंडीत दोन्ही बाजूचे जवान गस्त देत असतात. वाद मिटण्याची काही लक्षणे नाहीत. तडजोड करणे म्हणजे अपमान स्वीकारणे, आपली पौरुषहीनता कबूल करणे असा एक मोठा गंड सर्व नागरिकांच्या आणि नेत्यांच्या मनात घर करून समझोता करावा आणि प्रश्न मिटवून टाकावा, तेथे ठेवाच्या लागणाऱ्या प्रचंड लष्कराचा खर्च आणि तकलीफ कमी करावी अशी हिम्मत कोणी नेता करणार नाही. त्याच्या विरुद्ध लगेच, भारतमातेचे विच्छेदन केल्याचा गिल्ला होईल. मध्येतरी, काही नेत्यांनी थोडा समजुतीचा सूर काढण्याचा प्रयत्न केला; पण लोकांची प्रतिक्रिया पाहिल्यावर त्यांनी तातडीने काढता पाय घेतला.

 जम्मू आणि काश्मिरचा प्रश्न तर त्याहूनही निकराचा. हिंदु आणि मुसलमान या दोन जमातीत उभे हाडवैर. अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झली तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कमेकांविषयी कमालीचा विद्वेष आणि शत्रुभावना धगधग राहिली आहे. भलेभले सज्जन हिंदुस्थानी आणि पाकिस्तानीसुद्धा हिंदुस्थान-पाकिस्तानच्या वादात न्याय, सत्य, शांती या मूल्यांचा काही संबंध नाही असे मानतात. पाकिस्तानी तेवढा सारा नीच. दिसेल तेव्हा ठोकून काढावा अशी हिंदुस्थानात भावना आणि तीच परिस्थिती पाकिस्तानातही. फाळणीच्या वेळी पाकिस्तानला तोडून दिलेले सिंध, पंजाब, बलुचिस्तान, पूर्व बंगाल हे प्रांत

भारतासाठी । १९५