पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/188

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकुणास ठाऊक? आईवडिलांची परवानगी घेतली पाहिजे..." या अठराविसाच्या माणसाला तरुण म्हणणार काय? तारुण्य कोणामध्ये आहे असं म्हणायचं? याची एक व्याख्या आहे. माणसाला तारुण्यात एक गोष्ट जमते. जी आयुष्यात पढे कधी जमत नाही. देशाला स्वातंत्र्य हवं आहे असं वाटल्यानंतर समद्रामध्ये उडी फेकणारे सावरकर हे फक्त तारुण्यातच सवरकर असतात; हसत हसत फाशी स्वीकारणारे भगतसिंग-सुखदेव-राजगुरु हे फक्त तारुण्यातच म्हणजे जी गोष्ट तारुण्यातच तसं करू शकतात. कारण, तारुण्य म्हणजे जी गोष्ट आपल्याला पटते आणि प्रिय वाटते त्याकरिता संबंध जीव फेकून देण्याची तयारी असण्याची अवस्था. जन्माचं सर्टिफिकेट बघून कोणाला तरुण म्हणता येणार नाही. तरुणपणी माणसं प्रेम का करतात? कारण आपल्याला जी व्यक्ती प्रिय वाटते तिच्या प्राप्तीकरिता आयुष्य फेकून देण्याची त्यावेळी तयारी असते.
 ही तारुण्याची ताकद जर तुमच्याकडे असेल तर एक गोष्ट करा. देशाची गेली पन्नास वर्षे आम्ही फुकट घालवली. आम्हाला भलं काही करता आलं नाही, माझ्यासारखी काही माणसं धडपड करत राहिली; पण आमच्या डोळ्यांदेखत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झालेली भारतमाता या सगळ्या नतद्रष्ट लोकांनी ओढत ओढत द्रौपदीसारखी भर दरबारात काढली आहे. तिला वाचवण्याचं काम करायची हिम्मत आणि बुद्धी निदान तुमच्या पिढीत येवो अशी फक्त इच्छा आणि अशा व्यक्त करतो.

(२१ नोव्हेंबर १९९७)

♦♦

भारतासाठी । १८८