पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येत नाही तो एम.ए. होतो कसा? आणि त्याला नोकरी मिळते कशी? या समाजवादाच्या जमान्यामध्ये नोकरदारांनी काही केलं पाहिजे अशी अपेक्षाचं काही केलं पाहिजे अशी अपेक्षाच नाही. एकदा नोकरी मिळाली म्हणजे जहागीरीच मिळाली; पुढे काळजी करण्याचं कारणच नाही, कारण त्याला काढणारं कुणीच नाही. परवा प्रामाणिक सरकारी नोकर भेटला. तो म्हणाला, "गेल्या महिन्यापर्यंत माझा महिन्याचा पगार बारा हजार रुपये होता. पाचवा वेतन आयोग झाला आणि माझा पगार एका महिन्यात साडेएकोणीस हजार झाला. मला इतकं वाईट वाटून राहिलं आहे की, मी बारा हजारांचं ही काम करत नव्हतो." तुम्हाला जर का काही काम न करता साडेएकोणीस हजार मिळत असतील तर त्याचा अर्थ असा की शेतामध्ये घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, शेतमाऊलीला त्यांनी गाळलेल्या घामाचंसुद्धा दाम मिळणार नाही; कारण ते तुम्ही खाल्लेलं असेल. जर का कष्ट न करता, घाम न गाळता कुणाला काही फळ मिळत असेल तर त्याचा अर्थ असा की, घाम गाळणाऱ्या कुणातरी दुसऱ्याचं फळ त्याच्या हातातून काढून घेऊन तो खातो आहे.
 ही सगळी परिस्थिती मी तुम्हा विद्यार्थ्यांसमोर ठेवली. उद्देश असा की, या विषयावर तुम्ही विचार करावा, अभ्यास करावा. कोणी तरी येऊन फूस लावून देतं त्याला बळी पडून विचार करून नका, आमच्या पिढीनं जी चूक केली ती तुम्ही करू नका हे सांगण्याकरिता हे तुमच्यापुढं मांडलं. म्हणजे १९८५ साली जो दिला तोच संदेश- अभ्यास करा आणि उत्तर शोधा की, "आमच्या आईवडिलांना एक दिवससुद्धा सुखाचा का मिळाला नाही." हे करताना ज्या काही अडचणी येतात, गारूडी जादूगार दिसतात, आपलं लक्ष वेधून घेतात त्यांच्यापासून सावध राहायण्याकरिता दोन गोष्टी सल्ला म्हणून सांगतो.
 तुम्ही अभ्यासातून अमूकच एक निष्कर्ष काढा हे मी सांगत नाही. माझंच म्हणणं ऐका असंही सांगत नाही. फक्त सावधानतेचा इशारा देतो.

 विचार करण्याच्या मार्गामध्ये दोन मोठ्या अडचणी असतात. एक म्हणजे, आपण लहान असतो तेव्हा आपले आईबाप काय शिकवतात? वडीलधाऱ्यांचा प्रेमादर करावा! योग्यच आहे. आई आपल्याला वाढवते त्यामुळे आईविषयी प्रेम असतंच, वडिलांविषयीही असतं; पण लहान मुलांना पहिल्यापासून सांगतात की, मोठ्या लोकांना जितकी अक्कल असते तितकी लहान मुलांना येण्याची शक्यता नाही. मला हे घरामध्ये मानतात याचं फारसं वाईट वाटत नाही; पण बाहेरसुद्धा तसंच सरधोपटपणे मानतात याचं वाईट वाटतं. एक अनुभव सांगतो.

भारतासाठी । १८५