पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यार्थी म्हणून शहरात आलात, अडचणी खूप, रहायला जागा नाही. अगदी छोट्या शहरामध्येही माणसं आपल्यापेक्षा चांगली राहातात आणि पुष्कळांच्या बाबतीत एस टीने डब आल तर जेवायची सोय आहे, नाहीतर जेवणाचीही गैरसोय; आपल्याला इंग्रजी म्हटलं की, भीती वाटते आणि त्या मानाने इथे राहणाऱ्या नोकदारांची मुलं इंग्रजी पटकन शिकतात, कसा काय आपला नंबर यायचा. कसं काय आपण पास होणार अशी सतत चिंता."

 त्या पत्रात मी असंही म्हटलं की, "तुम्हाला आणखीही एक अडचण येणार आहे. विशेषतः अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असं लक्षात येईल की तुमच्या पाठ्यपुस्कामध्ये जे लिहिलं आहे ते खोटं आहे. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राच्या पुस्तकात तुम्हाला असं लिहिलेलं सापडेल की हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप सुधारली आहे. सरकार त्याला भरपूर मदत करतं, सूट सबसिडी देतं, खतावर सूट आहे, औषधावर सूट आहे, कर्जावर सूट आहे; वर त्याला इन्कमटॅक्स भरावा लागत नाही त्यामुळे शेतकरी मोठा मालामाल झाला आहे. असं अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेलं आहे आणि ही पुस्तकं चागल्या जाणकारांनी, तंज्ज्ञांनी लिहिलेली आहेत; पण तुम्हाला माहिती आहे की, हे खोटं आहे; पण तुम्ही जर का पेपरात लिहिलं की हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला सबसिडी नाही, त्याची शेती तोट्यात चालली आहे तर तुम्हाल परिक्षेत नापास करतील." मग त्या पत्रात शेतकरी विद्यार्थ्यांना मी पहिला सल्ला दिला की, "पेपरात लिहिण्याकरिता पुस्तकात जे जे काही खोटं लिहिलं आहे तेसुद्धा शिकून घ्या आणि परीक्षा पास व्हा. सर्कशीमध्ये वाघ असतो वाघाचं काम काही रिंगातून उड्या मारणं आणि खुर्चीवर जाऊन बसणं हे नाही; पण सर्कशीत पोट भरायचं म्हणजे त्याला बिचाऱ्याला रिंगातून उड्या माराव्या लागतात,खुर्चीवर जाऊन बसावं लागतं. तेव्हा, वेळ येईपर्यंत तेही खोटं शिकून घ्या; पण, माझी एक विनंती आहे, आठवड्यातून एक दिवस कुठे तरी एकत्र जमा. आठवड्यातून नाही जमलं तर पंधरा दिवसातून नाही जमलं तर पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, कधीतरी जमा आणि एक काम करा. शाळा, कॉलेज असलेल्या छोट्याशा शहरातीलसुद्धा रस्त्यातून चालताना काही घरांमध्ये, काही बंगल्यांमध्ये विजेचे दिवे आहेत, दाराखिडक्यांना व्यवस्थित पडदे लावलेले आहेत आणि त्या घराबंगल्यांतले आईवडील एकमेकांशी आनंदाने बोलतात, हसतात, मुलांशी खेळतात, मुलांना खेळणी आणून देतात मुलांचं कौतुक करतात, आपलं बाळ आज किती छान दिसतंय. म्हणून एकमेकांचं

भारतासाठी । १७८