पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपल्या देशात तर एक महात्मा असा होऊन गेला की ज्यानं सव्वाशे वर्षांपूर्वीच आजच्या परिस्थितीच भाकित केलं होतं. त्यावेळी नुकतेच म्हणजे १८८३ साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटलं, अरे, तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणता; पण तुमच्याकडे 'एकमय लोक' या अर्थी राष्ट्र आहे काय? ब्राह्मणांना वाटतं आपण ब्राह्मण, मराठ्यांना वाटतं आपण मराठे, प्रत्येक जातिधर्माच्या लोकांना वाटतं की आपण या जातीचे किंवा त्या धर्माचे. कुणाला विचारलं की तू कोण आहेस, तर मी 'हिंदी' आहे असं सांगणारी माणसं आहेत किती? असं सांगणारी बहुसंख्य माणसं असली तरर 'राष्ट्र' आहे आणि मग राष्ट्रीय काँग्रेस करण्यात काही अर्थ आहे आणि मग राष्ट्रीय स्वातंत्र्याचं बघता येईल. आमचा देश असा की बहुसंख्य लोकांना शाळेत जायचा अधिकार नाही, पुस्तक वाचायला अधिकार नाही, देवळात जाण्याचासुद्धा अधिकार नाही; आम्ही एकमेकांना भाऊसुद्धा समजत नाही. आज इंग्रज आहेत म्हणून त्यांच्या धाकाने दिनाद गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. जर का इंग्रज निघून गेला तर इथे पुन्हा पेशावाईचं राज्य तयार होईल आणि सर्वसामान्य माणसाचा इथे काहीही विकास होणार नाही.
 हे भाकीत जोतिबा फुल्यांनी सव्वाशे वर्षापूर्वी वर्तवलं होतं.
 तेव्हा, आज स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षी जो गोंधळ आपल्याला दिसतो आहे तो होणार हे पहिल्यापासून स्पष्ट होतं. तरीदेखील आंधळ्यासारखे आपण चालत गेलो. माझी एकच इच्छा आहे की, आज 'स्वातंत्र नासलं' म्हणून आपण डोळ्यातून पाणी काढतो आहोत, पण निदान २०४७ साली स्वातंत्र्याचा शंभरावा वाढदिवस येईल तेव्हातरी आपली परिस्थिती थोडी सुधारलेली असावी, आणखी खालावलेली असू नये.

 आज जगातल्या सगळ्यात दरिद्री, सगळ्यात भिकार देशांत हिंदुस्थानची गणना आहे. शंभर वर्षांनंतर निदान आपण दोनपाच नंबर तरी वर येऊ का? विद्यार्थी जसं परीक्षेतल्या आपल्या नंबरचा विचार करतात तसं. जगाच्या परीक्षेत हिंदुस्थान हा नापास झालेल्या देशांत आहे. शंभराव्या वर्षी तरी आपण निदान पास तरी होऊ का ही चिंता मला आहे; कारण, लोकसभेमध्ये चर्चा झाली, जी आपण टेलिव्हिजनवर पाहिली, त्यात मोठमोठी खासदार मंडळी जे बोली ते बोलणं ऐकून माझी मोठी निराशा झाली. या लोकांना, "आपाली वाट चुकली, नवी वाट शोधायला पाहिजे." हेसुद्धा माहीत नाही, आपण चाललो आहोत तीच वाट बरोबर आहे असं ही मंडळी लोकसभेमध्ये बोलली. हे अगदी चिंताजनक

भारतासाठी । १७६