पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून एखाद्या दांडग्या हुकूमशहाचा उदय होऊ शकतो; पण, एखादा अवतार होऊन त्याने या देशाची सूत्रे हाती घ्यावी अशी इच्छा व्यक्त करून सर्वसामान्य माणूस आपल्या अगतिकतेला वाट मोकळी करून देतो. केसरींनी सोनियाजींचा धावा केलाच आहे, आणखी काहीजण कडेपाटात (विंगामध्ये) रांगा लावून उभे आहेत.
 लालुछाप राजकीय गुंडागर्दी, टोळीनायकांचे राजकारणात खुलेआम पदार्पण आणि खिळखिळी झालेली कायदा व सुव्यवस्था यंत्रणा अशी परिस्थिती चालूच राहिली तर स्वतःला हिटलर म्हणवणाऱ्या विदूषकांना ती पर्वणीच ठरणार आहे.
 ज्याने आपल्या देशाचे आणि देशातील लोकांचे काही कायमचे भले केले आहे असा हुकुमशहा जगाच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही. बहुतेक सर्व हुकुमशहा राष्ट्रीयता, सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची गरज, शिस्तीचे महत्त्व इत्यादि संकल्पना लोकांच्या माथी मारण्यात यशस्वी झाले आणि चिल्लर गुन्हेगारांना निष्ठूरपणे अमानूष शिक्षा करून त्यांनी लोकांच्या मनात भयगंड तयार केला. आपली सद्दी संपताच या हुकुमशहांनी आपल्यासह आपल्या लोकांना आणि देशाला दुर्दशेच्या गर्तेत ढकलून दिले. हिंदू मानसिकता 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ।' मधील परमेश्वरी अवताराच्या संकल्पनेच्या आधारानेच घडलेली आहे. आज, आगामी अवताराच्या भरोशावर आणि प्रतीक्षेत जणू सारा देश निष्क्रीय बनून निपचित पडला आहे.
 हे सर्व समजण्यासारखे आहे. सधार कार्यक्रमातील आपली धरसोड पाहता देशापुढे लवकरच भयानक आर्थिक संकट उभे राहणार आहे हे उघड आहे. तरीसद्धा. गंभीरपणे आत्मपरीक्षण करून, संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीमध्ये योग्य ते बदल करण्याऐवजी हा देश आपले स्वातंत्र्य व सत्ता एखाद्या टिनपाट हुकुमशहाच्या चरणी अर्पण करण्याची शक्यताच अधिक दिसते.

 स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या नानी पालखीवालांसारख्यांनी या सर्व सुधारकार्यक्रमविरोधी कावकावमध्ये सामील व्हावे ही गोष्ट मोठी प्रक्षुब्ध करणारी आहे. असोसिएटेड सिमेंट कंपनी लि. त्राब्ऋ च्या ६१ व्या सर्वसाधारण सभेसाठी अध्यक्षपदावरून त्यांनी केलेल्या निवेदनाला विस्तृत प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या या निवेदनात श्री. पालखीवालांनी, पन्नास वर्षात देशाला आजच्या दुःखद अवस्थेत आणण्यास कारणीभूत असलेल्या सहा चुकांची यादी दिली आहे. या यादीत समाजवाद, नियोजन, वर्धमान नोकरशाही, स्वयंपूर्णतेचा वेडगळ धोशा, किंवा शेतीची

भारतासाठी । १७१