पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पवित्र किंवा डुकरासारखा निषिद्ध प्राणी हे नाही; कारण यावेळी ती हिंदुमुसलमानातील नाही. दलित समाजातील एका मोठ्या वर्गाला परमेश्वरासमान असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यामुळे दंगल सुरू झाली, हा एक फरक, दुसरा फरक म्हणजे, दंगलीचे स्वरूप दोन जमातीतील युद्धाचे नाही; दलित कार्यकर्ते पोलिस आणि शासन यांच्याविरुद्ध उठले आहेत. संताप व्यक्त करण्यासाठी रस्ता बंद, रेल्वे बंद, शहर बंद असले उपद्व्याप करीत आहेत.
 पुतळ्यांची विटंबना कोणी केली? महाराष्ट्राचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणतात, "आमच्या हाती निश्चित पुरावा आला आहे; लवकरच अपराध्यांना अटक होईल." हारातील चपलांवर असलेली धूळ आणि घाम यांची प्रयोगशाळांत तपासणी होत आहे व त्या आधारे गुन्हेगारांचा ठावठिकाणा लावण्याचे प्रयत्न होत असल्याचीही बातमी आहे. दलित असला पाहिजे; बाहेरून कोणी येईल आणि उंच पुतळ्याच्या बाजूला चढून पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न करेल आणि ते कोणाच्याच लक्षात येणार नाही असा संभाव फार कमी आहे.
 हे कृत्य कोणी केले याला तसे फारसे महत्त्व नाही. राजा ढाले म्हणतात तसे हे कृत्य दलिताचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो दलित समजबूज राखणारा असेल, कोणी अर्धवट पागलही असू शकेल, कोणी हे कृत्य दारूच्या कैफातही केले असेल. कदाचित तो दलित नसेल, सवर्ण नसेल, हिंदूही नसेल.
 आपण आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करताना पकडले गेलो तर आपले हाल कुत्रा खाणार नाही. एवढीही समज ज्याला नाही असा पागल पुतळ्यावर चढेल आणि त्याला चपलांचा हार घालेल ही शक्यता जवळपास शून्य आहे. एखाद्या अर्धवट वेड्याला हाताशी धरून काही शहाण्यासुरत्या, धोरणी, मतलबी, जाणकार माणसांनी हे घडवून आणले असणे शक्य आहे. मराठवाड्यात झालेल्या दंगलीत शिवाजीच्या पुतळ्याला विटंबणारा, एका ठिकाणीतरी ठार राजकारणी पुढारी असण्याची शक्यता जबरदस्त मोठी आहे.

 हिंदु मुसलमानांच्या दंग्याबाबत झालेल्या चौकशीत असा निष्कर्ष अनेक वेळा निघाला आहे. हिंदु आणि मुसलमानांत संघर्ष निर्माण करण्यात दोन्ही जमातीतील जातीवादी पुढाऱ्यांना स्वारस्य असते. बाबरी मशीदीच्या कांडानंतर मुंबईल दंगे उसळले, बाँबस्फोट झाले, वातावरण असुरक्षिततेचे झाले. दंगलीच्या काळात आपले आईबाप केवळ कोण्या एका धर्माचे होते म्हणून आपल्या पोटात सुरा भोसकला जाऊ शकतो किंवा रॉकेल टाकून आपल्याला जाळले

भारतासाठी । १६४