पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


तेव्हा कोठे जातो तुमचा धर्म?


 भ्रष्टाचाराबद्दल सगळीकडे मोठा गहजब चालला आहे. देशापुढील सर्वात मोठी समस्या भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट मंत्र्यांना पदावरून हटवले आणि तुरुंगात पाठवले म्हणजे निम्मे काम झाले. उरलेल्या सर्वसाधारण जनांची नैतिकतेची पातळी वाढवली म्हणजे सारे कसे स्वच्छ स्वच्छ होईल! आणि लायसेंसपरमीट राज्यसद्धा बिनभ्रष्टाचाराचे कसे सुरळीत चालू लागेल: देशात सगळीकडे आवादी आवाद होईल! अशी मांडणी जो तो करत आहे. शेषन यांनी कोणता एक नवा पक्ष काढला त्याचा प्रमुख कार्यक्रमच भ्रष्टाचार निर्मूलन. लष्कराच्या कोठावळे खात्यात आण्णासाहेब हजारे नोकरी करत होते. इतके भ्रष्ट खाते दुसरे कोणतेच नसेले; पण त्यासंबंधी अवाक्षरही न काढलेले अण्णासाहेब हजारे भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी उपोषणाचा रतीब घालत आहेत.

 कोण्या लालूच्या प्रसादाने जन्मलेले यादव नामधारी गायीगुराचा चारा आणि वैरण खाऊन गेले. रक्कम हजारावर कोटी! राजीव गांधीचा बोफोर्समधील ६४ कोटीचा मामला अगदी फिका पडला. हवाला प्रकरण गाजले, कोण्या जैनच्या रोजनिशीमध्ये केलेल्या नोंदीवरून मोठ्यामोठ्यांची नावे पुढे आली. जम्मू काश्मीरमधील आतंकवाद्यांपासून अडवानींपर्यंत ते शरद यादवपासन सीताराम केसरीपर्यंत सर्व मान्यताप्राप्त पुढाऱ्यांच्या 'मास्टर' जैनसाहेबांच्या डायरीत सापडला. वर्षाभराने हायकोर्टाने ठरवले की रोजनिशीचा पुरावा पुरेसा नाही, त्यामुळे सगळे श्वास मोकळे झाले. जैनकडून पैसे घेल्याचे कबूल केलेले शरद यादवही मोकळे झाले. राजीव गांधी हयात असतानाच हेलिकॉप्टर प्रकरणी, पाणबुडीप्रकरणी, बोफोर्स प्रकरणी त्यांनी भरपूर पैसा कमावल्याच्या बातम्या होत्याच. आता त्याचे सज्जड पुरावे पुढे येऊ लागले; पण मयतावर खटला कसा चालवणार? क्वात्रोची या इटालियन गृहस्थाला बोफोर्स कंपनीने वीसपंचवीस

भारतासाठी । १५८